X

Fact Check: संघ कार्यकर्त्याला बंदी बनवल्याच्या नावावर व्हायरल झाला RSS च्या रॅली चा जुना व्हिडिओ

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट मध्ये केलेला दावा खोटा ठरला. २५ डिसेंबर २०१९ चे संघाचे पथसंचलन आता खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

  • By Vishvas News
  • Updated: March 5, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर राष्ट्रीय स्वयं स्वयंसेवक संघाच्या रॅली चा एक जुना व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे. यूजर्स हा व्हिडिओ शेअर करून दावा करत आहेत कि एका संघ कार्यकर्त्याला बंदी बनवल्या नंतर २० हजार कार्यकर्त्यांनी रॅली काढली.

विश्वास न्यूज ने व्हायरल होत असलेल्या दाव्याचा तपास केला, त्यात असे कळले कि हा व्हिडिओ २५ डिसेंबर, २०१९ चा, हैदराबादचा आहे. या रॅली चा अजून एक व्हिडिओ आधी देखील खोट्या दाव्यासह व्हायरल झाला आहे. त्याचा तपास तुम्ही इथे वाचू शकता.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर राकेश यादव हिंदू यांनी २५ फेब्रुवारी रोजी एक व्हिडिओ अपलोड करून दावा केला: ‘Rss कार्यकर्ता को बनाया था बंदी बदले में 20 हजार कार्यकर्ता ने निकाली रैली।
या व्हिडिओ मध्ये संघ कार्यकर्त्यांचा पथसंचलन बघू शकतो. राकेश यादव व्यतिरिक्त देखील बरेच यूजर्स हा व्हिडिओ खोट्या दाव्यांसह सोशल मीडिया वर व्हायरल करत आहेत. या फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
व्हायरल व्हिडिओ च्या मागचे सत्य जाणून घेण्यास सगळ्यात आधी, विश्वास न्यूज ने या व्हिडिओ चा शोध InVID टूलच्या मदतीने घेण्याचा प्रयत्न केला. यातून आम्हाला बरेच स्क्रिनग्रेब मिळाले आणि त्यानंतर आम्ही त्या ग्रेब्स ला रिव्हर्स इमेज द्वारे शोधण्यास सुरुवात केली. ओरिजिनल व्हिडिओ आम्हाला युट्युब वर मिळाला. त्यात सांगिलते गेले होते कि संघानी हैदराबाद येथे एक विशाल पथसंचलनाचे आयोजन केले. ओरिजिनल व्हिडिओ तुम्ही खाली बघू शकता.

आतापर्यंतच्या तपासावरून हे कळले कि हा व्हिडिओ जुना आहे जो आता व्हायरल होत आहे. तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही या विशाल आयोजनाच्या बातम्या शोधण्यास सुरुवात केली. गुगळे सर्च मध्ये कीवर्डस वापरल्यावर आम्हाला बऱ्याच या घटनेसोबत आधारित बातम्या मिळाल्या. ‘द न्यूज मिनट’ ने अशीच एक बातमी प्रकाशित केली.

त्यांच्या रिपोर्ट प्रमाणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे प्रमुख मोहन भागवत ने सरुरनगर स्टेडियम मध्ये २५ डिसेंबर २०१९ रोजी स्वयंसेवकांना संबोधित केले, त्याची रिपोर्ट तुम्ही इथे वाचू शकता.

तपासादरम्यान आम्ही हैदराबाद च्या पथसंचालनाची बातमी न्यूज एजेन्सी वर शोधण्यास सुरु केली. आम्हाला एएनआई च्या ट्विटर हैंडल वर एक पोस्ट मिळाली. २५ डिसेंबर २०१९ रोजी चार छायाचित्र ट्विट करून एएनआई ने संघाचे पथसंचलन आणि बैठक या बद्दल माहिती दिली होती, ती तुम्ही खाली बघू शकता.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह-संपर्क प्रमुख नरेंदर कुमार यांना संपर्क केला. त्यांनी हा व्हिडिओ जुना असल्याचे सांगितले, तसेच सध्या अशी कुठलीच घटना घडली नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.

आम्ही ज्या यूजर ने हा व्हिडिओ खोट्या दाव्यासह शेअर केला त्या यूजर चा तपास केला. तपासात आम्हाला कळले कि राकेश यादव हिंदू हे दिल्ली चे रहिवासी आहेत. त्यांना दोन हजार पेक्षा जास्ती लोकं फोल्लो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट मध्ये केलेला दावा खोटा ठरला. २५ डिसेंबर २०१९ चे संघाचे पथसंचलन आता खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

  • Claim Review : संघ कार्यकर्त्याला बंदी बनवल्यावर संघाने काढली रॅली
  • Claimed By : राकेश यादव हिंदू
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later