X

Fact Check: जोडायची माळ घालतानाच्या व्हिडिओचा बिहार निवडणुकांसोबत काही संबंध नाही

  • By Vishvas News
  • Updated: October 23, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये एक वयस्कर भाजप नेत्याला जोड्यांची माळ घालून देताना दिसतं, यूजर्स असा दावा करत आहेत कि हा व्हिडिओ बिहार निवडणुकांसोबत जुडलेला आहे.

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला, त्यात आम्हाला असे कळले कि हा मध्य प्रदेश चा जुना व्हिडिओ आहे जो आता बिहार निवडणुकांसोबत जोडून व्हायरल केला जात आहे. आमच्या तपासात हि व्हायरल पोस्ट खोटी ठरली. व्हायरल व्हिडिओ चा बिहार निवडणुकांसोबत काही संबंध नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर संजय कुमार यादव सेना यांनी ९ ऑक्टोबर रोजी एक व्हिडिओ अपलोड करून दावा केला कि बिहार विधानसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये भाजप चा कल दिसण्यास सुरु झाला आहे.
दावा: बिहार विधानसभा चुनाव की प्रचार में बीजेपी का रुझान आना शुरू हो गया है।

या पोस्ट ला खरे मानून बऱ्याच यूजर्स ने कंमेंट आणि त्याला शेअर करण्यास सुरुवात केली आहे.
या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल व्हिडिओ ला InVID टूल मध्ये अपलोड केले आणि त्यातून बरेच ग्रॅब घेतले. त्यानंतर आम्ही गूगल रिव्हर्स इमेज चा वापर करून या ग्रॅब चा तपास केला. या तपासादरम्यान, न्यूज 18 च्या वेबसाईट वर अपलोड केलेली एक बातमी सापडली, ज्यात या व्हिडिओ चा वापर केला गेला आहे. ८ जानेवारी २०१८ रोजी अपलोड केलेल्या बातमीत सांगितले गेले आहे कि नगर परिषद च्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकांच्यावेळी भाजप उम्मेदवार दिनेश शर्मा वोट मागायला गेले असताना, एका वयस्कर व्यक्तीने त्यांना जोड्यांचा हार घालून दिला. पूर्ण बातमी इथे वाचा.

तपासादरम्यान आम्हाला नई दुनिया या संकेतस्थळावर पण एक या संबंधी बातमी मिळाली. ८ जानेवारी २०१८ रोजी प्रकाशित या बातमीत सांगितले गेले होते कि अध्यक्ष पदाचे उमेदवार दिनेश शर्मा यांना विरोधाला सामोरे जावे लागत आहे. त्यांना एका वयस्कर व्यक्ती ने जोडे चपलांचा हार घालून दिला. पूर्ण बातमी इथे वाचा.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने धार चे नई दुनिया चे प्रमुख प्रेम विजय पाटील यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि या व्हिडिओ चा बिहार निवडणुकांसोबत काहीच संबंध नाही आहे. हा व्हिडिओ धार जिल्ह्यातील धमनोद क्षेत्राच्या स्थानीय निकाय निवडणुकांचा आहे. यात भाजप च्या उमेदवाराला जोड्यांचा हार घालून देण्यात आला होता. हा व्हिडिओ जुना आहे असे देखील ते म्हणाले.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही ज्या यूजर ने हा दावा शेअर केला त्यांच्या प्रोफाइल चा तपास केला, आम्हाला फेसबुक यूजर संजर कुमार यादव सेना यांचा कल एका विशिष्ठ पार्टी कडे असल्याचा दिसला. ते बिहार येथील पटना चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात बिहार निवडणुकांच्या नावावर व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी असल्याचे समजले. मध्य प्रदेश मधील जुना व्हिडिओ आता बिहार चा सांगून व्हायरल केला जात आहे.

  • Claim Review : बिहार विधानसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये भाजप चा कल दिसण्यास सुरु झाला आहे.
  • Claimed By : Sanjay Kumar Yadav Sena
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later