X

Fact Check : व्हियेतनाम चे चित्र हिमाचल प्रदेश च्या नावाने होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात हिमाचल प्रदेश च्या नावावर व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी ठरली. व्हियेतनाम चे चित्र काही लोकं हिमाचल चे समजून शेअर करत आहेत.

  • By Vishvas News
  • Updated: August 28, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर एक पहाडांचे सुंदर छायाचित्र व्हायरल होताना दिसत आहे. यूजर्स हे चित्र हिमाचल प्रदेश चे समजून व्हायरल करत आहेत. विश्वास न्यूज ने व्हायरल चित्राचा तपास केला असता कळले कि ह्या चित्राचा हिमाचल सोबत काही संबंध नसून, हे चित्र व्हियेतनाम च्या मु-कां-चाय नावाच्या जिल्ह्याचे आहे. आमच्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे कळले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर संगम शर्मा ने 17 ऑगस्ट रोजी एक चित्र ‘पहाड़ियों की शान वखरी’ नावाच्या ग्रुप वर एक चित्र शेअर केले. ह्यात दावा करण्यात येत आहे कि हे दृश्य गांव-चढ़ना नौराधार, तहसील-राजगढ़, जिला-सिरमौर हिमाचल प्रदेश चे आहे, आमचा हिमाचल स्विट्ज़रलैंड पेक्षा कमी आहे का?

ह्याला खरे मानून दुसरे यूजर्स देखील हे चित्र शेअर करत आहेत. फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने हिमाचल प्रदेश च्या नावावर व्हायरल असलेल्या चित्राचा तपास करण्यासाठी ऑनलाईन टूल ची मदत घेतली. गूगल रिव्हर्स इमेज सर्च द्वारे कळले कि हे चित्र बऱ्याच वेबसाईट वर व्हियेतनाम च्या मु-कां-चाय जिल्ह्याच्या नावाने शेअर केले होते. हे चित्र इथे बघा.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही गूगल सर्च ची मदत घेतली. Mu-Cang-Chai-Vietnam टाईप करून सर्च केल्यावर आम्हाला व्हायरल चित्रासारखी लोकेशन मिळाली. चित्र व्हियेतनाम चे आहे, त्याचा हिमाचल प्रदेश सोबत काही संबंध नाही. हे चित्र इथे बघा.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने दैनिक जागरण च्या हिमाचल प्रदेश ऑफिस सोबत संपर्क केला. संवाददाता राजन पुंडीर ने या संबंधी, हिमाचल च्या राजगढ़ उपमंडल च्या कोटिया जाजर पंचायत चे उपप्रधान पवन तोमर आणि नोहराधार राजकीय वरिष्ठ माध्यमिक विद्यालय चे प्रवक्ता आणि हिमाचल प्रदेश प्रवक्ता संघ चे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र पुंडीर ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि व्हायरल चित्र हिमाचल च्या चाढना नोहराधार चे नाही आहे. मागील एक वर्षापासून हा फोटो लोकं नोहराधार क्षेत्र सांगून व्हायरल करत आहेत. जे खोटे आहे.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही खोटी पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर संगम शर्मा चा तपास केला, ते हिमाचल प्रदेश च्या कांगड़ा चे रहिवासी आहे. त्यांच्या अकाउंट ला तीन हजार पेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात हिमाचल प्रदेश च्या नावावर व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी ठरली. व्हियेतनाम चे चित्र काही लोकं हिमाचल चे समजून शेअर करत आहेत.

  • Claim Review : हिमाचल प्रदेश चे चित्र
  • Claimed By : फेसबुक यूजर संगम शर्मा
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later