Fact Check: 2014 मध्ये एका पुस्तकाच्या लाँचमधील पंतप्रधान मोदींचा फोटोला संपादित करून, केले जात आहे बनावट दाव्यासह व्हायरल
- By Vishvas News
- Updated: April 17, 2023

नवी दिल्ली (विश्वास न्यूज). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते ‘101 वेज टू सेव्ह अदानी (अदानींचा बचाव करण्याचे 101 मार्ग)’ अशा शीर्षकाचे पुस्तक वाचताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना वापरकर्ता, पीएम मोदींना टार्गेट करत आहे. विश्वास न्यूजने केलेल्या तपासणीत असे आढळून आले की, व्हायरल होत असलेले चित्र संपादित केले गेले आहे. या फोटोमध्ये 2014 मध्ये पुस्तक प्रकाशनाच्या वेळी, पीएम मोदी ‘गेटिंग इंडिया बॅक ऑन ट्रॅक (भारत पुन्हा प्रगतीपथावर)’ नावाचे पुस्तक वाचत होते.
काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?
एका फेसबुक वापरकर्त्याने एक व्हायरल पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये पीएम मोदींच्या हातात ‘वेज टू सेव्ह अदानी’ असे लिहिलेले एक पुस्तक आहे, तर वापरकर्त्याने फोटो शेअर केला आणि लिहिले आहे, “चीट-कोड नेहमी हातात… (Always keeping the cheat-code handy…)
पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पहा.
तपास
आमचा तपास सुरू करून, आम्ही सर्व प्रथम गुगल लेन्स (Google Lens)द्वारे व्हायरल चित्र शोधले. शोधात, आम्हाला 8 जून, 2014 रोजी carnegie-mec.org वेबसाइटवर अपलोड केलेली मूळ प्रतिमा सापडली. येथे दिलेल्या माहितीनुसार, “भारताचे पंतप्रधान बनल्यानंतर दोन आठवड्यांनंतर, श्री. नरेंद्र मोदी यांनी ‘गेटिंग इंडिया बॅक ऑन ट्रॅक: अॅन अॅक्शन अजेंडा फॉर रिफॉर्म’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. बिबेक देबरॉय, ऍशले जे. टेलिस आणि रीस ट्रेव्हर यांनी संपादित केलेले, गेटिंग इंडिया बॅक ऑन ट्रॅक (कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस अँड रँडम हाऊस इंडिया द्वारा प्रकाशित)मध्ये देशाला उच्च, शाश्वत विकास आणि आंतरराष्ट्रीय यशाच्या मार्गावर कसे परत नेले जावे, याबद्दल भारतातील काही निपुण विद्वानांचे विश्लेषण आणि उपाय आहेत.

जून 2014 मध्ये पीएमओ (PMO) इंडिया आणि नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर या बुक लॉन्चचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. येथे या व्हिडिओमध्ये देखील, पीएम मोदींच्या हातात “गेटिंग इंडिया बॅक ऑन ट्रॅक” हे पुस्तक दिसत आहे.
दोन चित्रांमधील फरक खाली स्पष्टपणे पाहिला जाऊ शकतो.

तपास पुढे नेत विश्वास न्यूजने भाजपचे प्रदेश प्रवक्ते श्री. अवनीश त्यागी यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, हे चित्र खूप जुने आणि संपादित आहे.
फेक पिक्चरला शेअर करणाऱ्या फेसबुक वापरकर्त्याच्या सोशल स्कॅनिंगमध्ये असे दिसून आले की, 343,755 लोक या पेजला फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूजला त्यांच्या तपासणीत असे आढळले की, व्हायरल होत असलेले चित्र संपादित केले गेले आहे. या फोटोमध्ये 2014 मध्ये पुस्तक प्रकाशनाच्या वेळी पीएम मोदी ‘गेटिंग इंडिया बॅक ऑन ट्रॅक’ नावाचे पुस्तक वाचत होते.
- Claim Review : पंतप्रधान मोदी '101 वेज टू सेव्ह अदानी' हे पुस्तक वाचत आहेत
- Claimed By : ભાજપ નો વિકાસ ગાંડો થયો છે
- Fact Check : False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
-
Whatsapp 9205270923
-
Email-Id contact@vishvasnews.com