X

Fact Check: ठाण्यात कास्टिंग काउच च्या आरोपींच्या पिताईचे भाजप चे नेते सांगून होत आहे व्हायरल

मुंबईच्या ठाण्यात कास्टिंग काउच च्या आरोपींना महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. हा व्हिडिओ भाजप नेत्यांची पिटाई केल्याच्या चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

  • By Vishvas News
  • Updated: August 5, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओ मध्ये काही महिला काही पुरुषांना मारहाण करताना दिसतात. दावा करण्यात येत आहे कि कि ह्या महिला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना मारहाण करत आहेत.
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचे समजले. व्हायरल व्हिडीओ मध्ये दिसत असलेले लोकं कास्टिंग काउच चे आरोपी आहे ज्यांना मारहाण करण्यात आली. ह्या आरोपींना महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) च्या कार्यकर्त्यांनी केली. हा व्हिडिओ आता भाजप कार्यकर्ते सांगून व्हायरल होत आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘Maya Punia’ ने व्हायरल व्हिडिओ शेअर केला (आर्काइव्ह लिंक) आणि लिहले: ”अब तो लगता है #महिलाओ ने भी #नारंगियों को ढूंढ़ ढूंढ़ कर हाथ सफाई सुरु कर दी है : 😂🙈😂।”
अन्य यूजर्स ने देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे.

तपास:
आम्ही व्हायरल व्हिडिओ च्या किफ्रेम्स काढल्या आणि त्यावर गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर केला. आम्हाला enavabharat.com च्या वेबसाईट वर प्रकाशित एक बातमी मिळाली. ज्यात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ चा स्क्रीनशॉट वापरला गेला आहे.

रिपोर्ट प्रमाणे पिक्चर मध्ये काम देण्याच्या आमिषावर एका एक्ट्रेस वर कास्टिंग काउच चा प्रयास केल्यास, काही मनसे कार्यकर्त्यांनी आरोपींना सगळ्यांसमोर मारहाण केली. हिंदी फिल्म मध्ये काम मिळवून देण्याचे वाचन देऊन आणि त्यानंतर त्यांना धमकावण्याच्या प्रकारात महाराष्ट्र पोलिसांनी ठाण्यातील ए महिला आणि तीन अन्य लोकांना पकडले. अधिकार्याने सांगितले कि एका २४ वर्षीय पीडितेने कसारवाडावली ठाण्यात कम्प्लेंट केल्यावर चेतासंबंधित केस रजिस्टर केला गेला.

इथे मिळालेल्या किवर्डस सोबत विश्वास न्यूज ने अजून तपास केला, आम्हाला inKhabar चे अधिकृत युट्युब चॅनेल मिळाले. चॅनेल वर 30 जुलै 2021 रोजी अपलोड केलेल्या एका बुलेटिन मध्ये या घटनबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. हा पूर्ण व्हिडिओ इथे बघा.

व्हिडिओ सोबत माहिती तीच आहे जी enavabharat.com या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. यात सांगितले गेले कि बॉलीवूड मध्ये कास्टिंग काउच ची घटना समोर आली आहे. फिल्म मध्ये काम मिळवून देण्याच्या बहाण्याने एका अभिनेत्री ला कॉम्प्रोमाईस करण्यास सांगितले गेले. पीडित अभिनेत्रीने हि गोष्ट आपल्या नातेवाईकांना आणि मनसे अधिकाऱ्यांना सांगितली त्यानंतर त्यांची पिटाई करण्यात आली.
एमएनएस सिनेमा विंग चे प्रेसिडेंट अमिय खोपकर ने ह्या घटनेचा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर अपलोड केला आहे.

आम्ही या संबंधी अमिय खोपकर यांना संपर्क केला. त्यांनी म्हंटले हा व्हिडिओ ३० जुलै चा आहे जेव्हा मनसे च्या कार्यकर्त्यांनी कास्टिंग काउच च्या आरोपींना मारहाण केली, पोलिसांनी या संबंधी चार आरोपींना अटक केली आहे, ज्यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. व्हायरल व्हिडिओ सोबत चा दावा चुकीचा आहे.

व्हायरल व्हिडिओ शेअर करणाऱ्या यूजर चा तपास केल्यास कळले कि यूजर चे फेसबुक वर जवळपास १०० पेक्षा जास्ती फॉलोवर्स आहेत. ते हरियाणा च्या हिसार चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: मुंबईच्या ठाण्यात कास्टिंग काउच च्या आरोपींना महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. हा व्हिडिओ भाजप नेत्यांची पिटाई केल्याच्या चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

  • Claim Review : भाजप नेत्यांना मारहाण
  • Claimed By : Maya Punia
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later