X

Fact Check: नाही, जपानने मायक्रोवेव्ह ओव्हनची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला नाही

विश्वास न्यूजने तपासात असे आढळले की जपान मायक्रोवेव्ह ओव्हनवर बंदी घालत नाही, व्हायरल दावा खोटा आहे.

  • By Vishvas News
  • Updated: November 15, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): जपानमध्ये वर्षाच्या अखेरीस मायक्रोवेव्ह ओव्हनवर पूर्णपणे बंदी घातली जाईल, असा दावा सोशलमीडियावर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. विश्वास न्यूजने पोस्टचा तापस केला आणि पोस्टमध्ये केलेले दावे खोटे असल्याचेआम्हाला कळले.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक प्रोफाइल, Salahari Leaks त्याच्या प्रोफाइलवर एक लंबा संदेश पोस्ट केला आहे ज्यामध्ये दावा केला आहे की जपानविविध कारणांमुळे मायक्रोवेव्ह ओव्हनवर बंदी घालेल.

काही लोक खालील दाव्यांसह ते WhatsApp वर देखील शेअर करत आहेत:

पोस्ट आणि त्याची संग्रहण आवृत्ती येथे तपासा.

तपास:

विश्वास न्यूजने साध्या गुगल सर्चने तपास सुरू केला. आम्ही पाहिले की कोणत्याही अधीकृत वृत्तसंस्थेने असा रिपोर्ट दिला नाही.

आम्हाला हा लेख रशियन वेबसाइटवर आढळला, ज्याने लेखाच्या स्पष्टपणे सांगितले आहे की

या साइटवरील सर्व मजकूर वास्तवाचे विचित्र विडंबन आहेत आणि वास्तविक बातम्या नाहीत .

म्हणजे हा एक पेरोडी वेबसाईट आहे.

विश्वास न्यूजला यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनच्या वेबसाइटवर एक लेख देखील सापडला ज्यामध्ये असे म्हटले आहे की, “आयोनायझिंग रेडिएशनच्या प्रदर्शनामुळे अणू आणि रेणू बदलू शकतात आणि सेंद्रिय पदार्थांमधील पेशींना नुकसान होऊ शकते.”

येथे लेख वाचा.

विश्वास न्यूजने शेवटी जपानमधील आशियाई वंशाचे पहिले भारतीय वंशाचे असेंबली सदस्य, योगेंद्र पुराणिक यांना संपर्क केला, तेजपानमधील मंत्रालयांमध्ये उद्योग सल्लागार आणि लेक्चरर देखील आहेत. त्यांनी विश्वास न्यूजला सांगितले की, “ही संपूर्ण खोटीबातमी आहे. मायक्रोवेव्ह खूप विकसित झाले आहेत. उत्पादन तंत्रात आरोग्याविषयी खूप जागरूकता आहे. दरम्यान, जपानमध्येवापरलेल्या ओव्हनची विल्हेवाट लावण्यासाठी खूप चांगली व्यवस्था आहे. ते घरांमधून गोळा केले जातात आणि नष्ट केले जातात, नंतरपुनर्वापर केले जातात.”

शेवटी, विश्वास न्यूजने व्हायरल दावा शेअर करणार्‍या वापरकर्त्याची तथ्य तपासणी केली. फेसबुक प्रोफाइल Salahari Leaks स्वतःला पत्रकार असल्याचे सांगतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूजने तपासात असे आढळले की जपान मायक्रोवेव्ह ओव्हनवर बंदी घालत नाही, व्हायरल दावा खोटा आहे.

  • Claim Review : जपान माइक्रोवेव्ह ओव्हन ची विल्हेवाट लावणार आहे
  • Claimed By : Salahari Leaks
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later