X

Fact-Check: महाराष्ट्र पोलिसांनी हा संदेश प्रसारित केला नाही, जाणून घ्या त्या मागचं सत्य!

निष्कर्ष: ‘आतां या पुढे म्हणजे 8/6/2020 पासून लॉकडाउन अंशतः / पूर्णपणे काढल्यास – फार काळजी घ्यावी लागणार आहे.’ अश्या आशयाचा मजकूर महाराष्ट्र पोलिसांनी प्रसारित केला नाही.

  • By Vishvas News
  • Updated: June 15, 2020

नवी दिल्ली, विश्वास न्यूज: काही दिवसांपासून एक संदेश विविध व्हाट्सअँप ग्रुप आणि सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. लोकडाऊन निर्बंध शिथिल केल्या नंतर सामान्य माणसाने घरातून बाहेर पडताना अनेक सावधगिरीचे पावले उचलायला हवी! असे असताना महाराष्ट्र ‘पोलिसांतर्फे प्रसारित केले’, असा दावा करणारा एक संदेश व्हायरल होतोय, पण विश्वास न्यूज च्या तपासात तो दावा खोटा असल्याचा आढळला. महाराष्ट्र पोलिसांनी असा कुठलाही संदेश प्रसारित केला नाही.

काय होतंय व्हायरल?

हा खालील मजकूर ‘Daily Amravati Mandal‘ या पेज नि फेसबुक वर शेअर केला आहे.

सावधान:पोलीस आयुक्तांकडून सूचना
आपल्या ग्रुप मधील सर्व लोक जबाबदार आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणारे जेष्ठ नागरीक आहात, याचा *अभिमान आहे.
आतां या पुढे म्हणजे 8/6/2020 पासून लॉकडाउन अंशतः / पूर्णपणे काढल्यास – फार काळजी घ्यावी लागणार आहे. *या पुढे खालील प्रकार घडू शकतात…

  • या कालावधीत बर्‍याच जणांची धंदा नोकरी गमावल्यामुळे / व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे, काही विक्षिप्त लोकांकडून *गुन्हे घडण्याची‌ शक्यता आहे.
  • घराबाहेर रहदारीच्या नियमांचे पालन करण्यात, आपण स्वतःची व आपल्या वस्तूंचे संरक्षण करण्यात कृतीशील असणे आवश्यक आहे.
  • आपण खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
  • महागडी घड्याळे घालू नका.
  • चैन, साखळ्या, घरातील महिलाना सोन्याचे कानातले बांगड्या घालू नका.
  • आपल्या हाताच्या पिशव्यांबाबत सावधगिरी बाळगा.
  • आपल्या मोबाईल फोनचा जास्त उपयोग गर्दीत लोकांमध्ये करु नका.
    सार्वजनिक ठिकाणी मोबाइल वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा.
  • आवश्यक पैशापेक्षा जास्त पैसे कॅश जव़ळ ठेऊ नका.
  • आपण बाहेर‌ जात असताना आपले क्रेडिट आणि डेबिट कार्ड सुरक्षित ठेवा.
  • आपल्या वडीलधारी, पत्नी, मुले सुरक्षीत आहेत की नाही हे पहाण्यासाठी, वेळीच कॉल करा.
  • घराच्या लोकांना सूचना द्या की दरवाजा ऊघडताना, मुख्य दरवाजापासून एक सुरक्षित अंतर ठेवा, शक्य असल्यास ग्रील गेट्स, ग्रिलच्या जवळ जाऊ नका.
  • मुलांना वेळोवेळी शक्य तितक्या लवकर घरी परत जाण्याची सूचना द्या.
  • घरी पोहोचण्यासाठी निर्जन किंवा शॉर्ट कट रस्ते घेऊ नका, प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त मुख्य रस्ते वापरा.
  • जेव्हा आपण बाहेर असाल तेव्हा आपल्या आसपासच्या हालचालींवर लक्ष ठेवा. मोबाईल वर गुंतू नका.
  • नेहमी आपत्कालीन मदत क्रमांक जवळ हाताला ठेवा.
  • लोकांपासून जास्तीत जास्त सुरक्षित अंतर ठेवा.
  • सगळेच जण‌ बहुधा मुखवटा परिधान करणारे असतील‌ त्यामुळे गुन्हेगार ओळखणे कठीण जाईल.
  • जे कॅब टॅक्सी सेवा वापरतात, त्यांनी प्रवासाचा तपशील आपले पालक, भावंड, नातेवाईक मित्र, संरक्षकांसह सामायिक करा. प्रत्येक वेळी कॅब क्रमांक त्यांना मेसेज करा.
  • कमीत कमी रोख व्यवहार करा, सुटे पैसे जवळ ठेवा.
  • आवश्यकता नसल्यास खरेदी करू नका.
  • मोठे व्यवहार शक्यतो एकट्याने करू नका.
  • वाद करु नका.

वाहनांमध्ये लॉक मध्ये कोणतीही मौल्यवान सोडू नका, काचा फोडल्या जाऊ शकतात.

  • *विनाकारण बाहेर भटकू नका.
  • पुढील काही महिन्यांपर्यंत किंवा एकंदरीत परिस्थिती सुधारण्यापर्यंत याचे पालन करावे लागेल.
    महाराष्ट्र पोलिसां तर्फे सार्वजनिक हितासाठी प्रसारीत…

तपास:

विश्वास न्यूज ने खरंच महाराष्ट्र पोलिसांतर्फे असा कुठला संदेश सार्वजनिक हितासाठी प्रसारित केला का याचा तपास केला. आम्ही सगळ्यात आधी पोलिसांच्या ट्विटर हॅन्डल वर असा कुठला संदेश शेअर करण्यात आला का ते बघितले. असे कुठेही आढळले नाही. महाराष्ट्र पोलिसांच्या ट्विटर हॅन्डल वर मात्र खालील विडिओ पोस्ट केल्याचे दिसले:

पण त्यात व्हायरल संदेशात सांगितलेल्या कुठल्याहि गोष्टीचा उल्लेख यात केलेला नव्हता. त्यात त्यांनी आपली कोरोनाव्हायरस वरची लढाई इथेच संपलेली नाही असे सांगितले. त्यात लोकांना कापड किंवा मास्क ने नाक आणि तोंड झाकण्यास देखील सांगितले. इतरांपासून ६ फूट अंतर ठेवा, कामाच्या ठिकाणी डिस्टंसिंग पाळा, परवानगी असलेल्या ठिकाणी वैयक्तिक व्यायाम करा, खरेदी करताना अनावश्यक वस्तूंना हाथ लावू नका, सार्वजनिक वाहतुकीचे साधन वापरताना गर्दी करू नका, परवानगी असलेल्या ठिकाणी आणि वेळेतच बाहेर जा, केवळ अत्यावश्यक गोष्टींसाठीच बाहेर जा असे काही मुद्दे त्या व्हिडिओमार्फत लोकांना सांगण्यात आले आहेत.

नंतर आम्ही, मुंबई पोलीस चे पीआरओ डीसीपी प्रणय अशोक यांना संपर्क केला, त्यांनी हा संदेश मुंबई पोलिसांनी शेअर केला नसल्याचे सांगितले. तसेच आम्ही नागपूर आणि पुणे इथल्या सायबर सेल ला पण संपर्क केला.

नागपूर सायबर सेल चे अएपीआय विशाल माने यांनी हा संदेश पोलिसांनी प्रसारित केले नसल्याचे सांगितले. तसेच, पुणे सायबर सेल च्या, पोलीस इन्स्पेक्टर राधिका फडके यांनी यांनी त्यांच्या सोशल मीडिया टीम सोबत आम्हाला संपर्क प्रस्थापित करून दिला. पुणे पोलिसांकडून असा संदेश प्रसारित झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा व्हायरल पोलिसांनी प्रसारित केला नाही असे विश्वास न्युज च्या तपासात कळले.

‘Daily Amravati Mandal’ या पेजवर हा मजकूर शेअर केला असल्याने, विश्वास न्यूज ने अमरावती चे पोलीस आयुक्त, संजयकुमार बाविस्कर यांच्या सोबत देखील संवाद साधला. त्यांनी हा व्हायरल संदेश, अमरावती पोलिसांनी प्रसारित केले नाही असे स्पष्ट केले. त्यांनी हा संदेश खोटा असल्याचे सांगितले.
या पोस्ट ला फेसबुक वर ८८ प्रतिक्रिया मिळाल्या आहेत आणि ७ जणांनी त्याला शेअर देखील केले आहे. Daily Amravati Mandal या फेसबुक पेज चा तपास घेतल्यास असे कळले कि या पेज ला ३९,००० लोकं फोल्लो करतात. आणि हे पेज एक हिंदी दैनिक चे पेज आहे असे त्यात नमूद केले आहे .

निष्कर्ष: निष्कर्ष: ‘आतां या पुढे म्हणजे 8/6/2020 पासून लॉकडाउन अंशतः / पूर्णपणे काढल्यास – फार काळजी घ्यावी लागणार आहे.’ अश्या आशयाचा मजकूर महाराष्ट्र पोलिसांनी प्रसारित केला नाही.

  • Claim Review : सावधान:पोलीस आयुक्तांकडून सूचना आपल्या ग्रुप मधील सर्व लोक जबाबदार आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणारे जेष्ठ नागरीक आहात, याचा *अभिमान आहे.
  • Claimed By : Daily Amravati Mandal
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later