X

Fact Check: नासिरुद्दीन शाह यांचा ट्विटर अकाउंट नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे

  • By Vishvas News
  • Updated: May 16, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर परत एकदा नासिरुद्दीन शाह यांच्या नावाचा एक फेक ट्विट व्हायरल होत आहे, या ट्विट ला खरे समजून लोकं नासिरुद्दीन शाह यांच्याच नावावर व्हायरल करत आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात हा ट्विट खोटा ठरला.

नासिरुद्दीन शाह हे सोशल मीडिया वर सक्रिय नाही. आधी देखील त्यांच्या नावाने बरेच फेक ट्विट व्हायरल झाले आहेत. याचा तपास तुम्ही इथे आणि इथे क्लिक करून वाचू शकता.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Sarfaraz Dhanse ने १३ मे रोजी एका व्हायरल ट्विट चा स्क्रीनशॉट अपलोड केला आणि लिहले: #Gulfam Sahab to kadak #kadak de rahe hai Mitro.
स्क्रीनशॉट मध्ये नासिरुद्दीन शाह यांचे छायाचित्र वापरले गेले होते आणि ट्विटर हॅन्डल वर @RealNaseeruddin लिहले होते. ट्विट चा कन्टेन्ट होता: ‘पिछली बार तो बड़ा दौड़-दौड़ कर TV पे आ रहे थे, की आज टॉर्च जला लो, आज ताली बला लो, थाली बजा लो, अबकी क्‍या हुआ सांपू सूंघ गया क्‍या??’

फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात ट्विटर हॅन्डल पासून केली ज्यावर नासिरुद्दीन शाह चे नाव वापरून ट्विट व्हायरल करण्यात येत होते. आम्हाला ट्विटर वर RealNaseeruddin नावाचा अकाउंट मिळाला. यावर नासिरुद्दीन शाह यांच्या छायाचित्राचा वापर केला गेला होता. या अकाउंट च्या सोशल स्कॅनिंग मध्ये आम्हाला कळलं कि हा अकाउंट फेब्रुवारी २०२१ मध्ये बनवला गेला आहे. या अकाउंट ला पाच हजार पेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात. हा हॅन्डल वेरिफाइड देखील नव्हता. सामान्यतः असे होत नाही. हा अकाउंट तुम्ही इथे बघू शकता.

तपासादरम्यान आम्हाला हा ट्विट देखील मिळाला जो व्हायरल करण्यात येत होता. तुम्ही हे इथे बघू शकता.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने मुंबई स्थित बॉलीवूड कव्हर करणाऱ्या दैनिक जागरण च्या मुख्य संवाददाता स्मिता श्रीवास्तव यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि नासिरुद्दीन शाह हे ट्विटर वर नाही, हा फेक अकाउंट आहे.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्हाला नासिरुद्दीन यांच्या पत्नी रत्ना पाठक यांचे देखील वक्तव्य मिळाले. ८ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रकाशित रत्ना पाठक यांच्या वक्तव्यात त्यांनी हे स्पष्ट केले कि नासिरुद्दीन शाह यांचे ट्विटर अकाउंट नाही. हि पूर्ण बातमी इथे वाचा.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. आम्हाला सोशल स्कॅनिंग मध्ये कळले कि फेसबुक यूजर Sarfaraz Dhanse मुंबई चे रहिवासी आहेत, त्यांना १३२७ लोकं फॉलो करतात आणि त्यांचा ४८७९ फ्रेंड्स आहेत.

निष्कर्ष: नासिरुद्दीन शाह यांच्या नावाने व्हायरल होत असलेला ट्विट खोटा आहे. विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि शाह यांचे ट्विटर अकाउंट नाही आहे.

  • Claim Review : ‘पिछली बार तो बड़ा दौड़-दौड़ कर TV पे आ रहे थे, की आज टॉर्च जला लो, आज ताली बला लो, थाली बजा लो, अबकी क्‍या हुआ सांपू सूंघ गया क्‍या??’
  • Claimed By : Sarfaraz Dhanse
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later