X

Fact Check: भोपाळ च्या जिम मधील मारा-मारीच्या व्हिडिओ मध्ये हिंदू-मुस्लिम एंगल नाही, तिघा एकाच समुदायाचे आहेत

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाले. भोपाळ मधील व्हिडिओ मध्ये ज्यात महिला नवरा आणि दुसऱ्या युवतीला मारहाण करते त्यात तिघेही एकाच समुदायाचे आहे.

  • By Vishvas News
  • Updated: October 25, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया च्या विभिन्न प्लॅटफॉर्म वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ह्यात एक बुर्क्यातली महिला चपलेने एका युवतीला आणि एका माणसाला मारताना दिसते. यूजर्स दावा करत आहे कि भोपाळ मध्ये एक मुस्लिम महिला आपल्या नवऱ्याची आणि त्याच्या हिंदू प्रेयसीची पिटाई करत आहे. काही यूजर्स ह्याला लव जिहाद ची घटना म्हणून व्हायरल करत आहे. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा दिशाभूल करणारा ठरला. भोपाळ मधील एका मुसलमान महिलेने आपल्या नवऱ्यावर शक असल्याकारणाने त्याच्या जिम मध्ये जाऊन त्याच्या कथित प्रेयसीला मारहाण केली प्रेमिका हिंदू नसून मुसलमान होती.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर राजा स‍िंह ने एक व्हिडिओ अपलोड केला आणि दावा केला: ‘भोपाल मैं एक जिम की घटना, मुस्लिम महिला की जागरूकता के कारण अपने पति को एवं उसकी हिन्दू प्रेमिका को तबियत से धोया गया, परंतु इस हिंदू महिला का परिवार जो कि शादीशुदा है अभी भी सो ही रहा है,
जो अपनी बहू,बेटी,पत्नी को जिम के माध्यम से इन लव जिहादियों को सौंप रहे हैं..इस विडियो से दो बातें स्पष्ट हैं पहली अब मुस्लिम महिलाओं मे तीन तलाक का भय नहीं है, इस महिला का तलाक तो निश्चित रूप से होना है क्योंकि वो बोल रही है कुछ मामला कोर्ट में है और कोर्ट के लिए सबूत वो जुटाने आई थी, और दुसरा ये जो कथित हिन्दू महिला है ये निश्चित रूप से सूटकेस कि यात्रा करेंगी।

फेसबुक पोस्ट चा कन्टेन्ट इथे जसाच्या तास लिहला आहे. पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

https://twitter.com/Rajiv1318/status/1450136361151844355

तपास:

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास सगळ्यात आधी गूगल सर्च च्या मदतीने केला. संबंधित किवर्ड टाईप करून आम्ही गूगल वर शोधला. आम्हाला झी न्यूज च्या वेबसाईट वर ह्याबाबतीत एक बातमी मिळाली. बातमीत व्हायरल व्हिडिओ चा वापर करण्यात आला होता. बातमीत सांगितले गेले होते कि मप्र च्या भोपाळ मध्ये कोहेफिजा मध्ये सुजा फिटनेस सेंटर मध्ये उरबा शाही नावाच्या महिलेने, तिचा नवरा तल्‍हा शमीर आणि त्याची गर्लफ्रेंड ह्यांना मारहाण केली. बातमी मध्ये कोहेफिजा टीआई अनिल वाजपेयी द्वारे सांगण्यात आले कि हि घटना 15 ऑक्टोबर ची आहे. महिलेचा खूप दिवसांपासून आपल्यानवर्यावर संशय होता. घटनेच्या दिवशी महिला नवऱ्याचा पाठलाग करत जिम पोहोचली आणि तिथे दोघांना मारहाण केली. ह्या बातमीत स्पष्ट नाही झाली कि महिला हिंदू होती कि मुसलमान.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने भोपाळ वरून प्रकाशित नईदुनिया वृत्तपत्राचा इ-पेपर तपासला. आम्हाला त्यात एक बातमी मिळाली, ह्यात देखील धर्माबद्दल सांगितले गेले नव्हते.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने भोपाळ मध्ये संपर्क केला. कोहेफिजा थाना प्रभारी अजय वाजपेयी ह्यांच्याप्रमाणे, ह्या केस मध्ये कुठेच हिंदू-मुस्लिम एंगल नव्हता. तिघे हि एकाच समुदायाचे होते.

विश्वास न्यूज ने शेवटी दिशाभूल करणारी पोस्ट अपलोड करणार्याचा तपास केला. त्यात आम्हाला कळले कि फेसबुक यूजर राजा स‍िंह च्या पेज ला दीड लाख पेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात. हा पेज 3 मे 2019 रोजी बनवला गेला.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाले. भोपाळ मधील व्हिडिओ मध्ये ज्यात महिला नवरा आणि दुसऱ्या युवतीला मारहाण करते त्यात तिघेही एकाच समुदायाचे आहे.

  • Claim Review : भोपाल मैं एक जिम की घटना, मुस्लिम महिला की जागरूकता के कारण अपने पति को एवं उसकी हिन्दू प्रेमिका को तबियत से धोया गया
  • Claimed By : फेसबुक यूजर राजा स‍िंह
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later