X

Fact Check: माइक्रोसॉफ्ट ने नाही केले सोनी ला एक्वायर, व्हायरल पोस्ट खोटी आहे

माइक्रोसॉफ ने सोनी ला एकवायर केले नाही. व्हायरल पोस्ट ने एका वेबसाईट वर प्रॅन्क म्हणून लिहलेले आर्टिकल शेअर केले.

  • By Vishvas News
  • Updated: January 12, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात दावा केला जात आहे कि माइक्रोसॉफ्ट ने सोनी ला एक्वायर केले. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. हि पोस्ट एका वेबसाईट वर थट्टा म्हणून शेअर करण्यात आली होती.  

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक पेज, CyberMonkeys.Tech वर हि पोस्ट शेअर केली गेली आहे, त्यासोबत इंग्रजीत लिहले आहे: मायक्रोसॉफ्ट ने सोनी च्या प्लेस्टेशन सहित साऱ्या डिव्हिजन सकट एक्वायर केले आहे.
या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन तुम्ही इथे बघू शकता.

तपास:

विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात गूगल वर कीवर्डस टाकून काही बातम्या शोधण्यापासून केली. जर मायक्रोसॉफ्ट ने सोनी ला विकत घेतले असते तर हि खूप मोठी बातमी असती आणि बऱ्याच मीडिया हाउसेस मध्ये आली असती, पण आम्हाला अशी मीडिया रिपोर्ट कुठेच मिळाली नाही, ज्यांनी या बातम्यांची खात्री होईल.

या नंतर आम्ही दोन्ही कंपन्या सोनी आणि मायक्रोसॉफ्ट यांचे सोशल मीडिया हॅन्डल चेक केले, यावर आम्हाला अक्विजीशन संबंधित कुठलीच माहिती मिळाली नाही.

आम्हाला आमच्या तपासादरम्यान, मायक्रोसॉफ्टर नावाच्या स्पॅनिश वेबसाईट वर एक आर्टिकल मिळाले. हे आर्टिकल २८ डिसेंबर २०२० रोजी प्रकाशित केले गेले होते. ह्या आर्टिकल मध्ये मायक्रोसॉफ्ट ने सोनी ला एक्वायर केल्याचे म्हंटले गेले, पण आर्टिकल च्या शेवटी स्पॅनिश मध्ये, ‘हैप्पी डे ऑफ द इनोसेंट्स’ लिहले गेले होते, अर्थात: हैप्पी अप्रैल फूल्स डे लिहले होते.

The Yukatan Times प्रमाणे, २८ डिसेंबर रोजी काही देशात होली इनोसेंट्स दिवस म्हणून मानवाला जातो. हे एप्रिल च्या पहिल्या दिवशी मनवले जाते. जे एप्रिल फूल्स दे सारखेच असते. या दिवशी काही प्रॅन्क रिपोर्ट पब्लिश होतात, व्हायरल पोस्ट पण त्यातलीच एक आहे.
विश्वास न्यूज ने सोनी च्या कस्टमर सर्व्हिस एजेंट ला चॅट मार्फत संपर्क केले, आणि व्हायरल पोस्ट बद्दल विचारणा केली. सर्विस एजेंट नि आम्हाला सांगितले कि असे काही झाले नाही आणि व्हायरल पोस्ट खोटी आहे.

फेसबुक वर व्हायरल पोस्ट, CyberMonkeys.Tech नावाच्या पेज ने शेअर केले आहे. या पेज च्या प्रोफाइल ला स्कॅन केल्यावर आम्हाला कळले कि हा पेज एका सॉफ्टवेअर कंपनी चा आहे आणि त्याला १० सप्टेंबर २०१९ रोजी बनवले गेले होते. बातमी लिहल्या गेल्यापर्यंत त्याचे एकूण ३९ फॉलोवर्स होते.

निष्कर्ष: माइक्रोसॉफ ने सोनी ला एकवायर केले नाही. व्हायरल पोस्ट ने एका वेबसाईट वर प्रॅन्क म्हणून लिहलेले आर्टिकल शेअर केले.

  • Claim Review : Microsoft acquires Sony with all its divisions, including PlayStation
  • Claimed By : CyberMonkeys.Tech
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later