
नवी दिल्ली (विश्वास न्यूज) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे एक बनावटी चित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चित्रात पीएम मोदी जिनपिंग यांच्यासमोर नतमस्तक झालेले दिसत आहेत. विश्वास न्यूजने या चित्राची तपासणी केली. आमच्या तपासणीत हे समोर आले आहे की मूळ चित्रासोबत खोडतोड करून हे व्हायरल होत असलेले चित्र तयार करण्यात आले आहे.
मूळ छायाचित्र हे चीनचे राष्ट्रपती भारत दौर्यावर असताना, महाबलीपुरम (मामल्लापुरम) येथे पोहोचले असताना, दिनांक 11 ऑक्टोबर 2019 रोजी घेतले आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज सर्वेश कुमार सिंह यांनी २० जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक खोटे छायाचित्र आपल्या प्रोफाइल वर अपलोड केले आणि लिहले:
‘इस दृश्य की #सीमा ये बताती है कि “सीमा” पर अब हमारी “सीमा” क्या होगी..’
हेच छायाचित्र फेसबुक आणि ट्विटर वर पण व्हायरल केले जात आहे.
या ओरिजिनल पोस्ट चे अर्काइव्ह लिंक बघा!
तपास:
विश्वास न्युज ने सगळ्यात आधी पंतप्रधान मोदी आणि चीन चे राष्ट्रपती जिनपिंग यांच्या व्हायरल होत असलेल्या छायाचित्राचे तपास केले आणि खरे काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही हे छायाचित्र गूगल रिवर्स इमेज टूल वर अपलोड करून शोधले. आम्हाला खरे छायाचित्र बऱ्याच वेबसाईट वर आढळले, पण आम्हाला मिळालेल्या खऱ्या छायाचित्रांमध्ये, नरेंद्र मोदी यांनी पांढरी वेष्टी, अर्ध्या बाह्यांचा शर्ट आणि खांद्यावरती अंगवस्त्र धारण केले आहे.
11 अक्टूबर 2019 रोजी गल्फन्यूज च्या वेबसाईट वर खरे छायाचित्र अपलोड केले होते. हे तेच छायाचित्र आहे ज्यासोबत खोडतोड करून मोदींविरुद्ध वापरण्यात आले आहे. हे छायाचित्र तेव्हाचे आहे, जेव्हा चीन चे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर असताना, तामिळनाडूच्या महाबलीपुरम च्या मंदिरात गेले होते. त्यांच्यासोबत पंतप्रधान मोदी देखील उपस्थित होते. मोदींनी तेव्हा दक्षिण भारतीय पेहराव धारण केला होता. पूर्ण बातमी इथे वाचा.
हेच छायाचित्र आम्हाला एबीपी च्या वेबसाईट वर देखील सापडले. इथे हे छायाचित्र पीटीआई चे असल्याचे स्पष्ट केले आहे.
संपूर्ण फोटो गॅलरी इथे बघा.
यानंतर आम्ही InVID टूल मध्ये Twitter सर्च या ऑप्शन मध्ये वेग-वेगळे कीवर्ड वापरून, नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाउंट वर अपलोड केलेल्या छायाचित्रांचा तपास घेतला. आम्हाला त्यात 11 अक्टूबर 2019 रोजी अपलोड केलेले छायाचित्र सापडले. या छायाचित्रांमध्ये दिसत असलेली इमारत हि व्हायरल झालेल्या छायाचित्रात पण आहे.
व्हायरल छायाचित्रावर आम्ही भाजप चे प्रवक्ता तेजिंदर पाल बग्गा यांच्यासोबत संपर्क साधला. त्यांनी आम्हाला व्हायरल छायाचित्र खोटे असल्याचे सांगितले. खरे छायाचित्र बघितल्यास, मोदींनी दक्षिण भारतीय पेहराव धारण केले असल्याचे दिसेल. कोणी तरी खऱ्या छायाचित्रासोबत खोड तोड करून त्याला वापरले आहे. असे कृत्य काँग्रेस द्वारा केले जात आहे. काँग्रेस चे धाबे दणाणले आहे, असे ते म्हणाले.
शेवटी आम्ही पीएम मोदी यांचे खोटे छायाचित्र व्हायरल करणाऱ्या फेसबुक पेजचा तपास केला. त्यात आम्हाला असे कळले कि सर्वेश कुमार सिंह नावाच्या या पेज ला ३७ हजार पेक्षा जास्त लोक फॉलो करतात. हा पेज 30 नवंबर 2015 रोजी बनवण्यात आला आहे. या पेज वर एका विशिष्ट राजनेतिक पार्टीच्या जास्ती पोस्ट शेअर केले जातात. यूजर हा अमेठी चा रहिवासी आहे.
निष्कर्ष: निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हायरल होत असलेले छायाचित्र खोटे असल्याचे आढळले. खऱ्या छायाचित्रासोबत खोडतोड करून मोदी हे चीन च्या राष्ट्रपतींसमोर नतमस्तक झालेत असे दाखवल्या गेले आहे.
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.