X

Fact Check: बँकेसमोर लागलेल्या रांगेचा जुना व्हिडिओ राशन ची लाईन सांगून व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. एक वर्षाआधी बँकेसमोर लागलेल्या रांगेचा व्हिडिओ आता राशन ची रांग सांगून व्हायरल करण्यात येत आहे.

  • By Vishvas News
  • Updated: June 1, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ह्यात रस्त्याच्या कडेला, महिला उभ्या किंवा बसलेल्या दिसतात. यूजर्स या व्हिडिओ ला शेअर करून दावा करत आहे कि हि रांग युपी मध्ये भारत सरकार कडून मोफत शिधा मिळत असल्याची आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हि पोस्ट खोटी असल्याचे समजले.

आमच्या तपासात कळले कि हा व्हिडिओ युपी मधील मुजफ्फरनगर चा २०२० चा आहे. ह्या व्हिडिओ मध्ये महिला बँकेसमोर जनधन खात्यातून पैसे काढण्यासाठी बसल्या आहेत. या व्हिडिओ चा राशन सोबत काहीच संबंध नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर विजय कुमार २६ मे रोजी एक व्हिडिओ अपलोड केला आणि लिहले: ‘U P में भारत सरकार से फ्री में राशन मिलने वाली भीड़ तो देखिए आपकी आंखें खुली की खुली रह जाएगी?’
या फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल व्हिडिओ ला निरखून बघितले. आम्हाला हि रांग राशन च्या दुकानासमोर लागलेली नसून, बँक ऑफ बडोदा समोर लागलेली आल्याचे दिसले. या नंतर आम्ही वेग वेगळे कीवर्डस वापरून ओरिजिनल व्हिडिओ शोधण्यास सुरुवात केली. आम्हाला असाच व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी मिळाला. आम्हाला न्यूज १८ च्या युट्युब चॅनेल वर असलेल्या एका बातमीत हा व्हिडिओ मिळाला. यात सांगितले गेले होते कि हा व्हिडिओ मुजफ्फरनगर स्थित बँक ऑफ बडोदा च्या बाहेर चा आहे. हा व्हिडिओ २०२० साली अपलोड केला गेला.

याच प्रकारे आम्हाला ओरिजिनल व्हिडिओ आरबी न्‍यूज नावाच्या एका युट्युब चॅनेल वर देखील मिळाला. या व्हिडिओ ला १७ एप्रिल २०२० ला अपलोड करून सांगितले होते कि हा व्हिडिओ मुजफ्फरनगर च्या गांधी कॉलोनी चा आहे.

आम्हाला अमरउजाला डॉट कॉम च्या वेबसाईट वर देखील हा व्हिडिओ मिळाला. १७ एप्रिल २०२० रोजी अपलोड केलेल्या बातमीत सांगितले गेले होते कि गांधी कॉलोनी स्थित बँक ऑफ बडोदा समोर जवळपास एक किलोमीटर लांब लाईन होती.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने दैनिक जागरण, मुजफ्फरनगर के ब्यूरो चीफ मनीष शर्मा यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि हा व्हिडिओ मागच्या वर्षी २०२० मध्ये लागलेल्या लोकडाऊन चा आहे. मागच्या वर्षी केंद्र सरकार ने असहाय लोकांसाठी त्यांच्या जनधन खात्यात मदत पाठवली होती. त्यानंतर बँकांमध्ये बऱ्याच लोकांनी जास्ती करून महिलांनी तिथे गर्दी केली. ह्या व्हिडिओ मध्ये जी रांग दिसत आहे ती नवी मंडी कोतवाली क्षेत्र मध्ये येत असलेल्या गांधी कॉलोनी च्या बँक ऑफ बडोदा समोर लागली आहे. हा व्हिडिओ आताच असल्याचे सांगितले जात आहे, जे खोटे आहे.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने त्या यूजर चे सोशल मीडिया स्कँनिंग केले ज्याने हि खोटी पोस्ट शेअर केली होती. त्यात आम्हाला कळले कि
फेसबुक यूजर विजय कुमार राजस्‍थान च्या अलवर च्या बानसूर चे रहिवासी आहेत. हे भगवा रक्षक टीम चे सदस्य आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. एक वर्षाआधी बँकेसमोर लागलेल्या रांगेचा व्हिडिओ आता राशन ची रांग सांगून व्हायरल करण्यात येत आहे.

  • Claim Review : युपी मध्ये राशन साठी रांग
  • Claimed By : विजय कुमार
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later