Fact Check: फ्री ओप्पो मोबाईल मिळणार असल्याचा दावा करत दिलेली हि लिंक खोटी आहे
मोफत ओप्पो मोबाईल देण्याचा हा व्हायरल दावा खोटा आहे. सायबर सुरक्षा तज्ञ संशयास्पद लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला देतो.
- By Vishvas News
- Updated: December 29, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मोफत ओप्पो मोबाईल जिंकता येईल असा दावा केला आहे. पोस्टमध्ये क्विझची लिंक दिलेली आहे. यासोबतच असा दावा केला जात आहे की या क्विझमध्ये सहभागी होऊन युजर्स ओप्पो फोन जिंकू शकतात. विश्वास न्यूजच्या तपासात हि लिंक संशयास्पद असल्याची समजले. हा दावा खोटा आहे. वापरकर्त्यांनी लिंकवर क्लिक करू नये.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर “मसरूर जान ” ने 19 डिसेंबर रोजी पोस्ट शेअर करून लिहले: टच करो और जीतो फ्री ओप्पो मोबाइल।
ह्या पोस्ट ला खरे समजून बाकी यूजर्स देखील असाच दावा शेअर करत आहेत. हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूजने मेसेज मध्ये दिलेली लिंक तपासून पोस्ट चा तपास सुरु केला. लिंकची URL ओप्पो च्या वेबसाइटची नव्हती. सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही या लिंकवर क्लिक केले नाही. तपास पुढे नेत आम्ही ओप्पो कंपनीचे सोशल मीडिया अकाउंट शोधले. आम्हाला अशा कोणत्याही क्वीज संबंधित कोणतीही पोस्ट सापडली नाही. तपासादरम्यान, आम्हाला 31 ऑक्टोबर 2022 रोजी ओप्पोच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट आढळले, ज्यामध्ये असे म्हटले आहे की सर्व ओप्पो स्पर्धा आणि भेटवस्तू त्यांच्या सोशल मीडिया चॅनेलवरच आयोजित केल्या जातील.
आम्हाला ओप्पो च्या वेबसाईट वर देखील अशी कुठली लिंक किंवा क्वीज बद्दल ची किंवा फ्री मध्ये ओप्पो मोबईल मिळत असल्याचे आढळून आले नाही.
अधिक तपशिलांसाठी आम्ही भारतीय सायबर आर्मीचे अध्यक्ष आणि भारतीय पोलिसांचे सायबर क्राइम सल्लागार किसले चौधरी यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्यासोबत व्हायरल लिंक शेअर केली. व्हायरल लिंक बनावट असल्याचे त्यांनी सांगितले. अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
यापूर्वी देखील ओप्पोशी संबंधित अनेक दावे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्याचा विश्वास न्यूजने तपास केला आहे. तुम्ही आमचा तपास इथे वाचू शकता.
शेवटी, आम्ही हे पोस्ट शेअर केलेल्या वापरकर्त्याची तपासणी केली. तपासादरम्यान असे आढळून आले की, युजर हा जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरचा रहिवासी आहे. फेसबुकवर युजरचे २१ मित्र आहेत.
निष्कर्ष: मोफत ओप्पो मोबाईल देण्याचा हा व्हायरल दावा खोटा आहे. सायबर सुरक्षा तज्ञ संशयास्पद लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला देतो.
- Claim Review : ओप्पो मोफत मोबाईल देत आहे.
- Claimed By : मसरूर जान
- Fact Check : False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
-
Whatsapp 9205270923
-
Email-Id contact@vishvasnews.com