X

Fact Check: नेदरलँड मध्ये पाचवीत गीतेचा अभ्यास अनिवार्य सांगणारा दावा खोटा आहे

नेदर्लंड्स च्या शाळांमध्ये पाचवी मध्ये गीतेचा अभ्यास करणे अनिवार्य आहे, हा दावा चुकीचा आहे. नेदर्लंड्स च्या शिक्षा मंत्रालय ने या दाव्याला खारीज केले आहे.

  • By Vishvas News
  • Updated: July 3, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर धार्मिक ग्रंथ भगवत गीतेबद्दल एक दावा व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्स दावा करत आहेत कि हे छायाचित्र नेदरलँड चे आहे आणि इथे पाचवीच्या विद्यार्थ्यांना गीतेचा अभ्यास अनिवार्य केला आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे ठरले. नेदरलँड च्या शिक्षा मंत्रालयाने पुष्टी केली कि असा कोणताच निर्णय घेण्यात आला नाही.

काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर Gaurav Kumar ने २८ जून २०२१ रोजी एक ट्विट केला, या ट्विट मध्ये लहान मुलं बघितले जाऊ शकतात ज्यांच्या हातात गीता आहे. छायाचित्रात लिहले आहे कि नेदरलँड मधल्या एका कायद्या प्रमाणे पाचवी पासून भगवत गीतेचा अभ्यास अनिवार्य केला आहे. या ट्विट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल दाव्याचा तपास इंटरनेट वर ओपन सर्च च्या द्वारे सुरुवात केली. आम्हाला या बद्दल कुठलीच अधिकृत बातमी मिळाली नाही, जे या व्हायरल दाव्याचे पुष्टीकरण करेल कि नेदर्लंड्स नि गीतेचा अभ्यास अनिवार्य केला आहे. आम्ही या दाव्याचा तपास किवर्डस द्वारे केला. आम्ही हे माहिती करून घेतले कि नेदर्लंड्स च्या शाळांमध्ये अनिवार्य विषय आहेत कोणते. आम्हाला नेदर्लंड्स च्या अधिकृत वेबसाईट वर government.nl वर या संबंधित माहिती मिळाली.

या वेबसाईट वर प्राइमरी एजुकेशन सेक्शन मध्ये या विषयांबद्दल सांगण्यात आले आहे. यात कुठलाच धार्मिक विषय नाही. इथे स्पष्ट सांगितले गेले आहे कि नेदर्लंड्स च्या सगळ्याच प्रायव्हेट शाळेत धार्मिक शिक्षा देतात पण पब्लिक ऑथॉरिटी प्रायमरी शाळेत असे होत नाही. याची माहिती इथे क्लिक करून बघा.

इतकी माहिती आमच्या हाती लागल्यावर आम्ही या छायाचित्राचा तपास सुरु केला. आम्ही व्हायरल छायाचित्रावर गूगल रिव्हर्स इमेज टूल चा वापर केला. आम्हाला हे छायाचित्र Pinterest साइट वर देखील मिळाले. सोबतच आम्हाला ह्या छायाचित्रात दिसत असलेल्या लहान मुलीचे सोलो छायाचित्र देखील मिळाले.

आम्ही या लहान मुलीचे छायाचित्र पुढे मल्टीपल गूगल रिवर्स इमेज सर्च टूल चा वापर करून शोधले. आम्हाला हे छायाचित्र iskcondesiretree.com वर Beautiful little Vaisnava या टायटल ने बनवलेल्या एका फोटो गॅलरी मध्ये व्हायरल छायाचित्र मिळाले. हि फोटो गॅलरी 20 सितंबर 2013 मध्ये बनवली गेली आहे. ती तुम्ही इथे बघू शकता.


आतापर्यंत हे स्पष्ट झाले होते कि हे छायाचित्र २०१३ पासून इंटरनेट वर आहे. हे छायाचित्र इस्कॉन सोबत जुडलेले आहे. आमच्या तपासात पुढे आम्ही डच एजुकेशन मिनिस्ट्री सोबत मेल वर हा दावा शेअर केला. आम्हाला डच मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन के प्रेस ऑफिसर Martijn Kamans ने उत्तर दिले कि डच शाळांमध्ये गीतेचा अभ्यास अनिवार्य नाही केला आहे.

आम्ही व्हायरल दावा शेअर करणारा ट्विटर यूजर Gaurav Kumar यांचे प्रोफाइल स्कॅन केले. हा प्रोफाइल जानेवारी २०२१ मध्ये बनवले गेला आहे आणि पर्यंत त्याचे ११ हजार फॉलोवर्स होते.

निष्कर्ष: नेदर्लंड्स च्या शाळांमध्ये पाचवी मध्ये गीतेचा अभ्यास करणे अनिवार्य आहे, हा दावा चुकीचा आहे. नेदर्लंड्स च्या शिक्षा मंत्रालय ने या दाव्याला खारीज केले आहे.

  • Claim Review : नेदरलँड मध्ये पाचवीत गीतेचा अभ्यास अनिवार्य
  • Claimed By : Gaurav Kumar
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later