X

Fact Check: प्रधान मंत्री जण कल्याण विभाग ज्यांनी कोविड लस घेतली त्यांना 5000 रु प्रदान करत आहे, व्हायरल दावा खोटा आहे

ज्यांनी लस घेतली आहे त्यांना प्रधानमंत्री जनकल्याण विभाग 5000 रुपये देत नाहीत, व्हायरल दावा खोटा आहे

  • By Vishvas News
  • Updated: July 11, 2022

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूजने त्यांच्या टिपलाइन क्रमांक +91 9599299372 वर दावा केला आहे की, कोविड-19 ची लस घेतलेल्यांना प्रधानमंत्री जन कल्याण विभाग 5000 रुपयांची मदत करत आहेत. हा दावा विविध सोशल नेटवर्किंग वेबसाइटवरही शेअर केला जात होता. विश्वास न्यूजने केलेल्या तपासणीत हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. ज्यांनी कोविडची लस घेतली आहे त्यांना प्रधानमंत्री जन कल्याण विभाग 5000 रुपये देत नाही, व्हायरल दावा खोटा आहे.

काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर Arun Sharma ह्यांनी व्हायरल दावा शेअर शेअर केला आणि लिहले:
1) एक आवश्यक सूचना –
जिन्होंने वैक्सीन लगा लिया उन्हें
5000 रु प्रधानमंत्री जन कल्याण
विभाग द्वारा दिया जा रहा है, आपने भी
कोरोना का वैक्सीन लगा लिया है तो
अभी फॉर्म भरें और 5000 रू प्राप्त करें
इस लिंक से फॉर्म भरें

भाषांतर: एक महत्त्वाची सूचना, ज्यांनी कोविड-19 लस घेतली आहे ते प्रधानमंत्री जनकल्याण विभागाकडून 5000 रुपये मिळविण्यासाठी पात्र आहेत, नोंदणी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

हि पोस्ट आणि ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूजने गुगल कीवर्ड सर्चद्वारे ह्या पोस्ट चा तपास सुरू केला आणि कोविड-19 लस घेतलेल्या लोकांना 5000 रुपये देण्याची ऑफर देणारी अशी कोणतीही योजना आहे का ते तपासले.

आम्हाला असे आढळले नाही की कोणत्याही विश्वासार्ह न्यूज वेबसाइटने यासंबंधीचा रिपोर्ट केला असेल.

अशा प्रकारच्या योजनेचा उल्लेख असल्यास आम्ही सरकारी पोर्टल देखील तपासले.

दरम्यान, आम्ही पोस्टमध्ये नमूद केलेली वेबसाइट देखील तपासली.

वेबसाइटने आम्हाला अर्ज करण्यास सांगितले आणि काही तपशील विचारले, जसे की नाव, पत्ता, कोणती लस घेतली गेली, पुढच्या टप्प्यात फॉर्ममध्ये आम्हाला पैसे कोणत्या मोडद्वारे मिळतील ते विचारले.
आणि मग शेवटी, पोर्टलने आम्हाला व्हाट्सअँप द्वारे किमान पाच लोकांना फॉर्म शेअर करण्यास सांगितले.

आतापर्यंत, हे स्पष्ट झाले होते की फॉर्म बनावट आहे, कारण कोणतेही सरकारी पोर्टल व्हाट्सअँप द्वारे फॉर्म सामायिक करण्यास सांगणार नाही.

तपासाच्या पुढील टप्प्यात आम्ही अमेय विश्वरूप यांच्याशी संपर्क साधला जे प्रधानमंत्री जन कल्याणकारी योजनेच्या प्रचार प्रसाराचे माजी प्रमुख आणि सध्या आत्मनिर्भर भारत अभियानाचे नागपूर प्रमुख आहेत. त्यांनी माहिती दिली की पोस्ट बनावट आहे, ज्यांनी कोविड लस घेतली आहे त्यांना 5000 रुपये देण्याची कोणतीही योजना सरकारने सुरू केलेली नाही. त्यांनी लोकांना त्यांचे वैयक्तिक तपशील अशा फॉर्मवर देऊ नयेत असेही सांगितले.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही पोस्ट शेअर केलेल्या वापरकर्त्याची पार्श्वभूमी तपासली. अरुण श्रमाचे 14 अनुयायी आहेत आणि ते 2014 पासून सक्रिय आहेत.

निष्कर्ष: ज्यांनी लस घेतली आहे त्यांना प्रधानमंत्री जनकल्याण विभाग 5000 रुपये देत नाहीत, व्हायरल दावा खोटा आहे

  • Claim Review : एक महत्त्वाची सूचना, ज्यांनी कोविड-19 लस घेतली आहे ते प्रधानमंत्री जनकल्याण विभागाकडून 5000 रुपये मिळविण्यासाठी पात्र आहेत, नोंदणी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  • Claimed By : Arun Sharma
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later