X
X

Fact Check: DPS वलसाडमध्ये मुलांना मारहाण करण्याच्या नावाखाली व्हायरल होत असलेला व्हिडिओ प्रत्यक्षात इजिप्तमधील आहे. 

विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समोर आले. गुजरातच्या नावाने व्हायरल होत असलेला व्हिडिओ प्रत्यक्षात इजिप्तमधील आहे, जिथे ओसामा मोहम्मद ओथमान नावाच्या एका अनाथाश्रमाच्या व्यवस्थापकाला मुलांना काठीने मारहाण करताना गुप्तपणे चित्रित करण्यात आले होते. या व्यक्तीला 2014 मध्येच अटक करण्यात आली होती.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज). सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस काही मुलांना बेदम मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ असा दावा करून शेअर केला जात आहे की, हे दृश्य गुजरातमधील वलसाड येथील डीपीएस शाळेतील आहे आणि मुलांना मारहाण करताना दिसणारा पुरुष शिक्षक शकील अहमद अन्सारी आहे.

विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळले. ही घटना इजिप्तमधील एका अनाथाश्रमातील आहे, जिथे 2014 मध्ये ओसामा मोहम्मद ओथमान नावाच्या व्यवस्थापकाने मुलांना मारहाण केली होती आणि हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आले होते.

काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?

Gopal Ji Gopal Ji नावाच्या एका फेसबुक वापरकर्त्याने व्हायरल व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुमच्या Whatsapp वर कितीही नंबर आणि ग्रुप असले तरी, एकही नंबर सोडू नका. हा व्हिडिओ सर्वांना पाठवा. हा व्हिडिओ DPS SCHOOL Rajbag येथील शिक्षक शकील अहमद अन्सारीचा आहे. तो इतका शेअर करा की, शिक्षक आणि शाळा दोन्ही बंद होतील. व्हिडिओ व्हायरल  झाल्याने खूप फरक पडतो आणि कारवाई होते. ज्यांना दया येत नाही त्यांनी आपले तोंड (टायपिंग) बंद ठेवावे.”

तपास 

व्हायरल व्हिडिओ यापूर्वीही खोट्या दाव्यांसह व्हायरल झाला होता आणि विश्वास न्यूजने त्यावेळी त्याची चौकशी केली होती. त्यावेळी आमच्या तपासादरम्यान, आम्हाला 10 सप्टेंबर 2014 रोजीची बीबीसीचा एक बातमी मिळाली होती, जिच्यामध्ये व्हायरल व्हिडिओचा स्क्रीनशॉट वापरण्यात आला होता. बातमीमध्ये म्हटले आहे की, इजिप्तच्या एका न्यायालयाने कैरोमधील एका अनाथाश्रमाच्या प्रमुखाला त्याच्या देखरेखीखाली असलेल्या सात मुलांना मारहाण केल्याच्या आणि त्यांचे जीवन धोक्यात आणल्याच्या आरोपाखाली तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या बातमीनुसार, ओसामा मोहम्मद ओथमानला ऑगस्टमध्ये, एक व्हिडिओ समोर आल्यानंतर अटक करण्यात आली होती ज्यामध्ये तो मुलांना काठीने मारहाण करताना दिसत होता.

कीवर्ड वापरून शोध घेतल्यावर, आम्हाला या प्रकरणाशी संबंधित इतर अनेक बातम्या आढळल्या ज्या येथे आणि येथे वाचता येतील.

विश्वास न्यूजने या प्रकरणी इजिप्तचे फॅक्ट चेकर मोहम्मद कसाब कडूनही माहिती मागविली आणि त्यांनीही पुष्टी केली की, हा व्हिडिओ इजिप्तमधील एका अनाथाश्रमातील आहे आणि ही घटना 2014 मधील आहे. त्यांनी सांगितले की, हा जुना व्हिडिओ अनेकदा खोट्या दाव्यांसह व्हायरल होतो.

याआधीही या खोट्या दाव्यासह वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यांची चौकशी विश्वास न्यूजने केली होती. ते फॅक्ट चेक येथे वाचता येतील.

ही पोस्ट Gopal Ji Gopal Ji नावाच्या फेसबुक वापरकर्त्याने शेअर केली केली होती. या वापरकर्त्याचे एकूण 5000 फॉलोअर्स आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समोर आले. गुजरातच्या नावाने व्हायरल होत असलेला व्हिडिओ प्रत्यक्षात इजिप्तमधील आहे, जिथे ओसामा मोहम्मद ओथमान नावाच्या एका अनाथाश्रमाच्या व्यवस्थापकाला मुलांना काठीने मारहाण करताना गुप्तपणे चित्रित करण्यात आले होते. या व्यक्तीला 2014 मध्येच अटक करण्यात आली होती.

  • Claim Review :  हे वलसाड येथील DPS SCHOOL Rajbag येथील शिक्षक शकील अहमद अन्सारी आहेत. 
  • Claimed By : Facebook User Gopal Ji Gopal Ji 
  • Fact Check : False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later