X

Fact Check: मंदिरात नाही, घरांमध्ये लागली होती आग, व्हिडिओ सांप्रदायिक दाव्यासह व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. श्रीनगर च्या परिमपोरा परिसरातील घरांमध्ये लागलेल्या आगीचा व्हिडिओ लोकं मंदिरात आग लावल्याच्या दाव्यासह होत आहे व्हायरल.

  • By Vishvas News
  • Updated: October 11, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक बत्तीस सेकंड चा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ह्यात काही इमारती जाळताना आपण बघू शकतो. यूजर्स हा व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल करत आहेत. दावा करण्यात येत आहे कि जम्मू आणि काश्मीर च्या शोपियां मधील जैनपुरा मध्ये काही अज्ञात लोकांनी मंदिराला आग लावली. विश्वास न्यूज च्या तपासात, व्हायरल व्हिडिओ सोबत करण्यात येणार दावा खोटा असल्याचे समजले. विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि श्रीनगर च्या परिमपुरा मध्ये लागलेल्या आगीला काही लोकं मंदिरात आग लागल्याच्या दाव्यासह व्हायरल करत आहेत. आमच्या तपासत व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Nripendranath Jha ने 7 ऑक्टोबर रोजी एक व्हिडिओ अपलोड केला आणि दावा केला कि शोपियां च्या एका मंदिरात आग लावण्यात आली. इंग्रजी मध्ये हे लिहण्यात आले होते: ‘Tempel situated at zainpora shopian burnt by some unknown person…

ह्याला खरे समजून बाकी यूजर्स देखील हा व्हिडिओ व्हायरल करत आहेत. ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्व्स न्यूज च्या तपासात व्हायरल व्हिडिओ च्या मागचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ InVID टूल मध्ये अपलोड करून त्याचे स्क्रीनग्रेब्स घेतले. त्यानंतर ह्या स्क्रीनग्रेब्स ला गूगल रिव्हर्स इमेज सर्च च्या मदतीने शोधले. सर्च च्या वेळी आम्हला, एक बातमी कश्‍मीरलाइफ डॉट नेट नावाच्या वेबसाईट वर मिळाली. इथे व्हायरल व्हिडिओ मधील एक स्क्रीनग्रेब चा वापर करण्यात आला होता. 7 ऑक्टोबर 2021 रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या ह्या बातमीत सांगितले गेले होते कि श्रीनगर च्या बाहेर च्या भागात परिमपोरा मध्ये भीषण आग लागली, ज्यात बरेच घरं जळले. हि आग फ्रुट मंडी च्या बाजूला लागली होती. पूर्ण बातमी इथे वाचा.

तपासावेळी आम्हाला ओरिजिनल व्हिडिओ काही युट्युब चॅनेल वर देखील मिळाला. द अर्थ न्‍यूज नावाच्या एका चॅनेल ने, 7 ऑक्टोबर रोजी हा व्हिडिओ अपलोड केला होता, त्यात लिहले होते, ‘श्रीनगर के फ्रूट मंडी परिसराच्या घरांमध्ये लागलेली आग’. पूर्ण व्हिडिओ इथे बघा.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने दैनिक जागरण, कश्‍मीर चे वरिष्‍ठ सहयोगी नवीन नवाज ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि व्हायरल पोस्ट खोटी आहे. हा व्हिडिओ परिमपोरा फ्रूट मंडी च्या आग दुर्घटनेचा आहे. ह्या आगीत बऱ्याच घरांचे नुकसान झाले. मंदिर जाळण्याचा दावा खोटा आहे.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. आम्हाला कळले कि फेसबुक यूजर Nripendranath Jha पटना चे रहिवासी आहे. त्यांच्या अकाउंट ला 338 लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. श्रीनगर च्या परिमपोरा परिसरातील घरांमध्ये लागलेल्या आगीचा व्हिडिओ लोकं मंदिरात आग लावल्याच्या दाव्यासह होत आहे व्हायरल.

  • Claim Review : काश्मीर च्या मंदिरात आग
  • Claimed By : Nripendranath Jha
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later