Fact Check: पाण्यावर तरंगणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचा हा व्हिडिओ भारतातील नाही
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्लास्टिकचा कचरा पाण्यावर तरंगताना पहिला जाऊ शकतो.
- By: Pallavi Mishra
- Published: Nov 12, 2025 at 07:16 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्लास्टिकचा कचरा पाण्यावर तरंगताना पहिला जाऊ शकतो. हा व्हिडिओ भारतातील असल्याचा दावा करून, त्याला शेअर केले जात आहे.
विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. व्हायरल होत असलेला व्हिडिओ भारतातील नाही तर ग्वाटेमालातील आहे. हा व्हिडिओ जून 2022 पासून इंटरनेटवर दिसून येत आहे.
काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?
‘fighting_to_be_free2′ या थ्रेड्स वापरकर्त्याने 18 ऑक्टोबर 2025 रोजी हा व्हायरल व्हिडिओ (संग्रहित लिंक) शेअर करताना लिहिले की, “तुम्ही कार्बन कर भरता, वीज बिलांचे भरमसाठ पैसे भरता, प्लास्टिकच्या स्ट्रॉवर बंदी घालता, आणि क्षणार्धात फाटणाऱ्या निरुपयोगी कागदी पिशव्या घेऊन फिरता. हे सर्व ‘पर्यावरण वाचवण्याच्या’ नावाखाली. आणि दुसरीकडे, भारतात ही परिस्थिती आहे.” या व्हिडिओमध्ये, प्लास्टिकचा कचरा पाण्यावर तरंगताना दिसून येत आहे.

तपास
तपास सुरू करण्यासाठी, आम्ही व्हायरल पोस्टमध्ये वापरलेल्या व्हिडिओचे स्क्रीनशॉटचा गुगल लेन्सवर शोध घेतला आणि 2012 मधील अनेक बातम्यांमध्ये आम्हाला हा व्हिडिओ आढळला.
22 जून 2022 रोजीच्या एबीसी न्यूजच्या एक्स पोस्टमध्ये हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता, ज्यामध्ये असे लिहिले होते की, “पर्यावरणवाद्यांच्या मते, जगातील सर्वात प्रदूषित मानल्या जाणाऱ्या रिओ मोटागुआ नदीतून ग्वाटेमालाच्या किनाऱ्यावर प्लास्टिक कचऱ्याचे ढीग वाहून येत आहेत.” हे फुटेज याच महिन्यात फ्लोरिडास्थित पर्यावरण गट, 4Ocean ने घेतले आहे. https://abcn.ws/3N9qRVN“
सीबीएस न्यूजच्या 22 जून 2022 रोजीच्या एक्स पोस्टमध्येही हा व्हिडिओ ग्वाटेमालाचा असल्याचा असल्याचा सांगून, या फुटेजचे श्रेय, 4Ocean ला देण्यात आले होते.
कीवर्ड्सचा वापर करून शोध घेतल्यानंतर, आम्हाला 7 जून 2025 रोजी पर्यावरण गट 4Ocean च्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केलेला हा मूळ व्हिडिओ सापडला. हा व्हिडिओ ग्वाटेमालाचा असल्याचा सांगून लिहिण्यात आले होते, “जर आम्ही तुम्हाला सांगितले की, ग्वाटेमालाचे किनारे सध्या असे दिसतात, तर काय होईल… पावसाळ्यात, जगातील सर्वात प्रदूषित नद्यांपैकी एक असलेल्या, रिओ मोटागुआमधून ग्वाटेमालाच्या किनाऱ्यावर लाखो पौंड प्लास्टिक कचरा वाहून येतो. पुढील आठवड्यात, 4ocean ऑपरेशन टीम आमच्या ग्वाटेमाला स्वच्छता केंद्राला भेट देईल. गेल्या दोन वर्षांपासून, आम्ही ग्वाटेमालाच्या समुद्रकिनाऱ्यांवरील प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करण्यासाठी आमच्या स्थानिक स्वच्छता पथकांना एकत्रित करत आहोत. आता, आम्ही कचरा समुद्रात पोहोचण्यापूर्वीच त्यास नदीवर रोखण्याचा प्रयत्न करत आहोत. या गुंतागुंतीच्या मोहिमेतील पुढील प्रगतीसाठी काम करत राहा.”

कीवर्ड्सचा वापर करून शोध घेतल्यानंतर, रिओ मोटागुआ मार्गे ग्वाटेमालाच्या किनाऱ्याला प्रदूषित करणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्याबद्दल अनेक बातम्या आढळल्या.
या संदर्भात आम्ही, 4Ocean चे संस्थापक Alex Schulze यांच्याशीही संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की, “हा व्हिडिओ ग्वाटेमालाचा होता, आणि या समुद्रकिनाऱ्याला आमच्या टीमने स्वच्छ केले होते.”
यानंतर आम्ही 4Ocean च्या इंस्टाग्राम पेजचा अधिक शोध घेतला. येथे 25 जून 2023 रोजी अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये असे म्हटले होते की, त्यांच्या टीमने 6 महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर या समुद्रकिनाऱ्याला स्वच्छ करून टाकले आहे.
ऑक्टोबर 2025 मध्ये प्रकाशित भारतातील प्रदूषित नद्यांवरील सीपीसीबीच्या अहवालात काय म्हटले आहे?
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) त्यांचा ऑक्टोबरचा एक अहवाल 15 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केला. या अहवालात देशातील जलसंपत्तीच्या गुणवत्तेचे मूल्यांकन केले जाते आणि बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (BOD) हे 3 mg/L पेक्षा जास्त असल्यास, पाणी आंघोळीसाठी आणि जलचर जीवनासाठी अयोग्य बनते आणि त्या निकषांवर आधारित नद्यांच्या विभागांना प्रदूषित म्हणून घोषित केले जाते. या मूल्यांकनानुसार, भारतातील 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 271 नद्यांमध्ये एकूण 296 प्रदूषित विभाग ओळखले गेले आहेत, जे 2018 मध्ये ओळखल्या गेलेल्या 351 विभागांच्या आणि 2022 मध्ये ओळखल्या गेलेल्या 311 विभागांच्या तुलनेत घट दर्शवते. या अहवालात नदीच्या आरोग्यात थोडीशी सुधारणा आढळून आली आहे. तथापि, महाराष्ट्रात अजूनही सर्वाधिक प्रदूषित विभाग (54) आहेत आणि दिल्लीतील यमुना नदीचा विभाग अजूनही गंभीरपणे प्रदूषित आहे, ज्याचे कमाल BOD मूल्य 83 mg/L पर्यंत आढळून आहे, जे निर्धारित प्रमाणापेक्षा 27 पट जास्त आहे. या अहवालात सांडपाणी प्रक्रिया, औद्योगिक कचरा व्यवस्थापन आणि नदी पात्र व्यवस्थापनात सतत आणि तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे.
खोट्या दाव्यासह व्हायरल व्हिडिओ शेअर करणाऱ्या ‘fighting_to_be_free2’ या वापरकर्त्याला थ्रेड्सवर 150 वापरकर्ते फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात असे आढळून आले की, पाण्यावर तरंगणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्याचा व्हायरल व्हिडिओ भारतातील नसून ग्वाटेमातील आहे.
- Claim Review : पाण्यावर तरंगणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्याचा हा व्हिडिओ भारतातील आहे.
- Claimed By : Threads user ‘fighting_to_be_free2’
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.











