X

Fact Check: मध्य प्रदेश च्या शिवपुरीच्या पुराचा व्हिडिओ भागलपूर नावाने व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे सिद्ध झाले. हि बातमी खरी आहे कि भागलपूर मध्ये पुरामुळे रेल मार्ग प्रभावित झाला पण व्हायरल व्हिडिओ बिहार च्या भागलपूर चा नसून मध्य प्रदेशच्या शिवपुरी च्या रेल मार्ग चा आहे. व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी आहे.

  • By Vishvas News
  • Updated: August 24, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर एक पुराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ह्यात रेल्वे च्या पटरी खाली पाणी वाहताना दिसतं. यूजर्स दावा करत आहेत कि हा व्हायरल व्हिडिओ, बिहार मधील भागलपूर चा आहे. विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि पोस्ट दिशाभूल करणारी आहे. मध्य प्रदेशच्या शिवपुरीचा व्हिडिओ आता काही लोकं भागलपूर नावाने व्हायरल करत आहेत.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज टीवी बिहार ने 17 ऑगस्ट रोजी एक व्हिडिओ अपलोड केला आणि लिहले: ‘रेल पटरी के नीचे से बह गई मिट्टी,स्थिति हुई विकट, ट्रेनों का परिचालन बंद। भागलपुर में बाढ़ के पानी ने ट्रेन की आवाजाही को एक और जगह रोक दिया है। भागलपुर से कहलगांव रेल खंड पर सबौर से आगे एवम ममलखा रेलवे स्टेशन के बीच रेल पटरी धंस गई है। पटरी के नीचे से बाढ़ का पानी बहने लगा है। नतीजा भागलपुर का रेल संपर्क सिर्फ बांका और दुमका रेल खंड के माध्यम से हो पाएगी। उस रेल रुट पर कई ट्रेन को कैंसिल किया गया है और कई ट्रेन के रूट में तब्दीली की गई है।’

फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. व्हायरल व्हिडिओ लोकं भागलपूरचा समजून व्हायरल करत आहेत.

तपास:
व्हायरल पोस्ट चा तपास करण्यासाठी विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी ऑनलाईन टूल्स ची मदत घेतली. InVID टूल वर व्हायरल व्हिडिओ अपलोड केल्यावर आम्हाला बरेच स्क्रीनग्रेब्स मिळाले. ह्यानंतर आम्ही ते ग्रेब्स गूगल रिव्हर्स इमेज सर्च वर टाकून सर्च केले. व्हायरल व्हिडिओ सारखाच व्हिडिओ आम्हाला बन्सल न्यूज च्या युट्युब चॅनेल वर मिळाला.चार ऑगस्ट रोजी अपलोड केलेल्या ह्या व्हिडिओ मध्ये, सांगितले होते कि, शिवपुरी मध्ये मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅक चे नुकसान झाले, ज्यामुळे कितीतरी किलोमीटर पेटारी गिट्टी आणि माती च्या खाली चालली गेली. माती वाहिल्यामुळे शिवपुरी ते मोहना मधला रेल्वे ट्रॅक उध्वस्त झाला.

ह्या संबंधित बातम्या आणि व्हिडिओ आम्हाला पत्रिका डॉट कॉम वर सापडले. 3 ऑगस्ट रोजी प्रकाशित ह्या बातमीत या बद्दल सांगण्यात आले आहे. तुम्ही हि बातमी इथे वाचू शकता.

ओरिजिनल व्हिडिओ आम्हाला रेल रोड फॅन क्लब नावाच्या युट्युब चॅनेल वर मिळाला. ह्यात स्पष्ट सांगितले गेले आहे कि हा व्हिडिओ ग्‍वालियर शिवपुरी रेल लाइन चा आहे. ह्याला तीन ऑगस्ट रोजी अपलोड करण्यात आले होते.

आता आम्हाला व्हिडिओ सोबत चे सत्य जाणून घ्यायचे होते. ह्यासाठी आम्ही गूगल सर्च चा वापर केला. आम्हाला लाईव्ह हिंदुस्थान च्या वेबसाईट वर 16 ऑगस्ट रोजी प्रकाशित एक बातमी मिळाली. ह्यात सांगितले गेले होते कि भागलपुर-कहलगांव च्या मध्ये लैलख ममलखा पाशी ब्रिज नंबर 144 ए च्या गर्डर पर्यन्यता पाणी पोहोचले त्यामुळे रेलखंड वर रेल्वे चे येणे जाणे थांबवण्यात आले. हि पूर्ण बातमी इथे वाचा. आम्हाला संबंधित बातमी न्यूज 18 च्या वेबसाइट वर देखील सापडली. ती तुम्ही इथे वाचू शकता.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही मध्य प्रदेश आणि बिहार दोन्ही ठिकाणी संपर्क केला. शिवपुरी चे नईदुनिया ब्यूरो चीफ अभिषेक शर्मा यांनी आम्हाला माहिती दिली कि व्हायरल व्हिडिओ 1 ऑगस्ट रोजी शिवपुरी जिल्ह्यात आलेल्या पुराचा आहे. हा ग्वालियर-इंदोर रेल्वे लाईन चा आहे. सिंध नदी मध्ये पुरामुळे ट्रॅक ला सगळ्यात जास्ती नुकसान झाले. आता तो दुरुस्त करण्यात आलेला आहे आणि ट्रेन्स नियमित सुरु झाल्या आहेत.

तसेच आम्ही दैनिक जागरण चे बिहार चे डिजिटल प्रभारी अमित आलोक यांना संपर्क केला, त्यांनी सांगितले कि व्हायरल व्हिडिओ भागलपूर चा नाही, पण पुराचा त्रास इथे देखील तेवढ्याच प्रमाणात झाला.

शेवटी आम्ही व्हायरल व्हिडिओ शेअर करणाऱ्या यूजर चा तपास केला. त्यात कळले फेसबुक पेज टीवी बिहार ला दोन हजार लोकं फॉलो करतात त्यात बिहार च्या बातम्या शेअर करण्यात येतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे सिद्ध झाले. हि बातमी खरी आहे कि भागलपूर मध्ये पुरामुळे रेल मार्ग प्रभावित झाला पण व्हायरल व्हिडिओ बिहार च्या भागलपूर चा नसून मध्य प्रदेशच्या शिवपुरी च्या रेल मार्ग चा आहे. व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी आहे.

  • Claim Review : भागलपूर पुराचा व्हिडिओ
  • Claimed By : फेसबुक पेज टीवी बिहार
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later