X

Fact Check: महाराष्ट्राच्या आंबोली फाल्स च्या नावाने व्हायरल होत आहे गुजरात चा व्हिडिओ

विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि व्हायरल व्हिडिओ आंबोली फॉल्स चा नसून गुजरात मधील, डांग चा व्हिडिओ आहे जो आता दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

  • By Vishvas News
  • Updated: July 19, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): देशाच्या अनेक भागात पावसामुळे लोकांचे हाल होत आहेत. आता या एपिसोडमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जबरदस्त धबधबा पाहायला मिळत आहे. वापरकर्ते ते महाराष्ट्रातील आंबोली फॉल्स म्हणून शेअर करत आहेत. विश्वास न्यूजने तपासात हा व्हिडिओ महाराष्ट्रातील आंबोली धबधब्यातील नसून गुजरातमधील असल्याचे आढळून आले आहे. गुजरातमधील हा व्हिडिओ भ्रामक दाव्यासह व्हायरल होत आहे.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक पज ‘All in one KR’s’ ने 14 जुलै रोजी व्हायरल व्हिडिओ अपलोड करून लिहले: ‘Deadly Amboli ghat & falls’

पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

आमचा तपास सुरू करण्यासाठी, आम्ही प्रथम InVid टूलवर व्हिडिओ अपलोड केला आणि काही कीफ्रेम काढल्या. गुगल रिव्हर्स इमेज वापरून शोधले. एका सर्च मध्ये, आम्हाला तोच व्हिडिओ YouTube चॅनेलवर सापडला. इथे व्हिडिओ गुजरातच्या डांग जिल्ह्यातील शिव घाटाचा आहे असे सांगितले होते.

या आधारावर शोध घेतल्यावर, आम्हाला तोच व्हिडिओ 14 जुलै 2022 रोजी ETV भारत महाराष्ट्रच्या अधिकृत फेसबुक पेजवर अपलोड केलेला आढळला. येथे व्हिडिओ अपलोड करताना त्याचे वर्णन गुजरातमधील डांग जिल्हा असे करण्यात आले आहे.

या व्हायरल व्हिडिओशी संबंधित माहिती 13 जुलै 2022 रोजी ETV भारत महाराष्ट्रच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या रिपोर्ट आढळून आली. बातमीनुसार, ‘गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. गुजरातमधील सात जिल्हेही पुराच्या पाण्याखाली आले आहेत. डांग जिल्ह्यात खापरी, अंबिका, पूर्णा आणि गिरा आणि लोकमाता धबधबे सध्या जोरात वाहत आहेत. 4 रस्त्यांवर (डांग जिल्हा धबधबा) येणाऱ्या या झऱ्यांच्या पाण्यामुळे 45 गावे बाधित झाली आहेत. संपूर्ण बातमी इथे वाचता येईल.

युट्युब सर्च वर शिव घाट शोधल्यावर नेमक्या त्याच व्हायरल व्हिडीओ सीनचे अनेक व्हिडिओ सापडले.

व्हायरल व्हिडिओमधील घाट 2 जुलै 2022 रोजी न्यूज18 गुजराती या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातमीत पाहता येतो. दिलेल्या मजकुरामुसार ‘पावसात फुलला डांग जिल्हा, अहवाजवळचा शिव घाट धबधबा जिवंत झाला.’

पुष्टीकरणासाठी, आम्ही आमचे गुजरात स्थित पत्रकार मनीष दुबे ह्यांना संपर्क केला आणि त्यांच्यासोबत व्हायरल व्हिडिओ शेअर केला. माहिती देताना त्यांनी सांगितले की, हा व्हिडिओ गुजरातमधील डांग जिल्ह्यातील आहे.

पोस्ट शेअर करणाऱ्या All in one KR’s पेजच्या सोशल स्कॅनिंगमध्ये, आम्हाला कळले की 114 लोक या पेजला फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि व्हायरल व्हिडिओ आंबोली फॉल्स चा नसून गुजरात मधील, डांग चा व्हिडिओ आहे जो आता दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

  • Claim Review : Deadly Amboli ghat & falls
  • Claimed By : All in one KR’s
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later