X

Fact Check: छत्तीसगडच्या कोरबाचा जुना व्हिडिओ आता मथुरेच्या नावाने व्हायरल

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात युपी मधील मथुरेच्या नावाने व्हायरल होणारा व्हिडिओ, हा छत्तीसगढ कोरबा चा असल्याचे सिद्ध झाले.

  • By Vishvas News
  • Updated: December 11, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ मथुरेतील असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये एक जमाव धावताना दिसत आहे. विश्वास न्यूजने व्हायरल पोस्ट चा तपास केला. व्हायरल झालेली पोस्ट बनावट असल्याचे आमच्या तपासात कळले. लोक छत्तीसगडमधील कोरबाचा व्हिडिओ मथुरेतील असल्याचे सांगून व्हायरल करत आहेत.

काय होत आहे व्हायरल?
पंडित रविराज सैंथिया ने 6 डिसेंबर रोजी 30 सेकंदाचा एक व्हिडिओ पोस्‍ट करून लिहले: ‘आज मथुरा की एक झलक’

ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूजने सर्वप्रथम गुगल सर्च केले. मथुरेशी संबंधित कीवर्ड टाईप करून शोध घेतल्यास, व्हायरल पोस्टच्या दाव्यांना पुष्टी देणारी एकही बातमी सापडली नाही. तपास सुरू ठेवत आम्ही मथुरा पोलिसांचे अधिकृत ट्विटर हँडल स्कॅन केले. तिथे आम्हाला मथुरा पोलिसांचा एक व्हिडिओ आणि त्यासंबंधी काही उत्तरे सापडली.

काही युजर्सनी ह्या व्हिडिओ मध्ये मथुरा पोलिसांना टॅग केले. ज्याच्या उत्तरात मथुरा पोलिसांनी लिहिले की हा व्हिडिओ मथुरा जिल्ह्याशी संबंधित नाही, हा दिशाभूल करणारा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. कृपया अफवा पसरवू नका. शांतता राखण्यास मदत करा.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करत, मथुरा पोलिसांनी सांगितले की, मथुरेच्या नावाने दिशाभूल करणारा व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी दीपक यादवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान विश्वास न्यूजने दैनिक जागरण मथुराचे वृत्तपत्र शोधण्यास सुरुवात केली. 7 डिसेंबरला एक बातमी प्रसिद्ध झाली. दिशाभूल करणारे व्हिडिओ पोस्ट करून वातावरण बिघडवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यात सांगण्यात आले. संपूर्ण बातमी वाचा.

विश्वास न्यूजने मथुरा येथील दैनिक जागरणचे प्रभारी विनीत मिश्रा ह्यांना संपर्क केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओचा मथुरेशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. व्हिडीओ नीट पाहिल्यास त्यात दिसणारे पोलीस यूपीचे नसल्याचे स्पष्ट होईल.

तपासादरम्यान, आम्हाला अनेक कमेंट्सवरून समजले की व्हिडिओमध्ये दिसणारे पोलीस छत्तीसगडमधील आहेत. या आधारे विश्वास न्यूजने छत्तीसगडमधून प्रकाशित होणाऱ्या नयी दुनिया वृत्तपत्राशी संपर्क केला. बिलासपूर येथून प्रसिद्ध झालेल्या नयी दुनिया चे निवासी संपादक सुनील गुप्ता यांच्याकडून आम्हाला कळले की, व्हायरल झालेला व्हिडिओ कोरबा येथील कोसाबारी चौकातील आहे. हा व्हिडिओ काही महिन्यांआधीचा आहे.

तपासादरम्यान, आम्हाला कळले की व्हायरल व्हिडिओ पोस्ट करणारा फेसबुक यूजर, पंडित रविराज सैंथिया, आग्रा, यूपीचे रहिवासी आहे. त्यांनी मार्च 2017 रोजी हे अकाउंट बनवले. त्यांना 7415 लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात युपी मधील मथुरेच्या नावाने व्हायरल होणारा व्हिडिओ, हा छत्तीसगढ कोरबा चा असल्याचे सिद्ध झाले.

  • Claim Review : मथुरा का वीडियो
  • Claimed By : पंडित रविराज सैंथिया
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later