X

Quick Fact Check : फर्रुखाबाद चा शिवलिंग अयोध्या चा सांगून परत केला जात आहे व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात, व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे कळले. जो शिवलिंग अयोध्येचा सांगून व्हायरल केला जात आहे, तो फर्रुखाबाद चा आहे. याला आता मुद्दाम काही लोकं अयोध्येचा सांगून व्हायरल करत आहेत.

  • By Vishvas News
  • Updated: April 6, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर परत एकदा एका शिवलिंगाचे छायाचित्र व्हायरल होत आहे. दावा करण्यात येत आहे कि अयोध्या मध्ये खोदकाम सुरु असताना हे शिवलिंग मिळाले आहे.
विश्वास न्यूज ने या आधी देखील या व्हायरल छायाचित्राचा तपास केला होता. आमच्या तपासात कळले कि २०१६ चे हे छायाचित्र लोकं सारखे, अयोध्या सोबत जोडून व्हायरल करत आहेत.

खरे छायाचित्र युपी च्या फर्रुखाबाद च्या मठिया देवी मंदिर चे आहे. २०१६ मध्ये तेव्हा मंदिराच्या खोदकामाच्या वेळी शिवलिंग चा एका मोठा भाग जमिनीच्या आतून निघाला होता. त्याच वेळी काही लोकांनी मुद्दाम हे छायाचित्र अयोध्येच्या नावावर व्हायरल केले होते. आमच्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर पवन यूके ने सरोज पांडेय फैन क्‍लब या ग्रुप वर एक एप्रिल रोजी एक छायाचित्र अपलोड करून लिहले: ‘भगवान श्री राम जिस शिवलिंग की पूजा करते थे वो मिला अयोध्या की खुदाई में आज जयकारे में कमी ना आए जय श्री राम

या पोस्ट ला दुसरे यूजर देखील व्हायरल करत आहेत. फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने आधी देखील एकदा या छायाचित्राचा तपास केला होता. गूगल रिव्हर्स इमेज टूल च्या मदतीने शोधल्यावर आम्हाला हे छायाचित्र अमर उजाला च्या वेबसाईट वर एका बातमीत मिळाले होते. हि बातमी 27 जुलाई 2016 रोजी पब्लिश झाली होती. छायाचित्राबद्दल माहिती देत लिहले होते, फर्रुखाबाद च्या मठिया देवी मंदिर मध्ये खोदकाम दरम्यान शिवलिंगाचा एक मोठा भाग जमिनीच्या आतून निघाला. पूर्ण बातमी तुम्ही इथे बघा.

व्हायरल पोस्ट वरून आम्ही अयोध्या स्थित, दैनिक जागरण चे वरिष्ठ पत्रकार रमाशरण अवस्‍थी यांच्यासोबत देखील संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल पोस्ट खोटी आहे. हे छायाचित्र अयोध्येचे नाही.

या पोस्ट चा विस्तारात तपास इथे वाचा.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात, विश्वास न्यूज ने खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. आम्हाला कळले कि फेसबुक यूजर, पवन यूके यांनी आपल्या अकाउंट ला लॉक केले आहे. आम्हाला कळले कि यूजर छत्तीसगढ चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात, व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे कळले. जो शिवलिंग अयोध्येचा सांगून व्हायरल केला जात आहे, तो फर्रुखाबाद चा आहे. याला आता मुद्दाम काही लोकं अयोध्येचा सांगून व्हायरल करत आहेत.

  • Claim Review : अयोध्येतील शिवलिंग
  • Claimed By : पवन यूके
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later