X

Quick Fact Check : सुधीर चौधरी वर नाही झाला हल्ला, खोटी पोस्ट परत होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समोर आले. सुधीर चौधरी यांच्यावर कुठलाच हल्ला झाला नाही.

  • By Vishvas News
  • Updated: August 20, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर एकद परत झी न्यूज चे मोठे पत्रकार सुधीर चौधरी यांच्याबद्दल एक खोटी पोस्ट व्हायरल होत आहे. हे छायाचित्र लोकं व्हायरल करत दावा करत आहेत कि झी न्यूज च्या नोयडा ऑफिस मध्ये सुधीर चौधरी ह्यांना मारहाण झाली. विश्वास न्यूज ने आधी देखील एकदा या पोस्ट चा तपास केला होता. आम्हाला कळले कि सुधीर चौधरी च्या ऍक्सीडेन्ट चे जुने चित्र आणि मुंबई मधील काँग्रेस च्या ऑफिस मध्ये झालेल्या हल्ल्याचे जुने चित्र आता कोलाज स्वरूपात खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर लीलाधर शरण ने सुधीर चौधरी यांच्याबद्दल के खोटी पोस्ट शेअर करत लिहले कि सुधीर चौधरी वर झालेल्या हल्ल्याची आम्ही निंदा करतो जशी किसानांच्या मृत्यू वर झी न्यूज करते.

पोस्ट मध्ये सुधीर चौधरी यांचे छायाचित्र दिसतात, ज्यात त्यांच्या नाकावर झालेली जखम दिसते, त्याच प्रमाणे ऑफिस मध्ये तुटलेले तुकडे देखील दिसतात.
हे दोन्ही चित्र कोलाज स्वरूपात बनवले गेले आहे आणि दावा केला आहे कि झी न्यूज च्या नोयडा ऑफिस मध्ये सुधीर चौधरी वर हल्ला झाला.
फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि २०१९ मध्ये मुंबई मध्ये सुधीर चौधरी यांचा एक छोटा ऍक्सीडेन्ट झाला होता. त्या घटनेत चौधरी यांचे चित्र लोकांनी व्हायरल केले होते. या संबंधी सुधीर यांनी सोशल मीडिया द्वारे स्पष्टीकरण दिले.

तसेच या व्हायरल पोस्ट मध्ये वापरले गेलेले दुसरे चित्र मुंबई च्या काँग्रेस ऑफिस वर झालेल्या हल्ल्याचे आहे. हे 1 डिसेंबर 2017 रोजी घडले. या संबंधी चित्र इथे बघा.

तपासादरम्यान विश्वास न्यूज ने सुधीर चौधरी यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि मुंबई मध्ये झालेल्या एक जुन्या ऍक्सीडेन्ट चे चित्र लोकं आता खोट्या दाव्यासह व्हायरल करत आहेत.

हा संपूर्ण तपास इथे वाचा.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समोर आले. सुधीर चौधरी यांच्यावर कुठलाच हल्ला झाला नाही.

  • Claim Review : सुधीर चौधरी वर हल्ला
  • Claimed By : फेसबुक यूजर लीलाधर शरण
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later