X

Fact Check: गुजरात चे इलेक्शन संपले कि राज्यात समान नागरी कायदा नाही, व्हायरल बातमी दिशाभूल करणारी

गुजरात निवडणूक झाल्यावर राज्यात समान नागरी कायदा लागू होईल असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस ह्यांनी केले नाही. त्यांनी योग्य वेळ आल्यावर हा कायदा लागू करू तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा निर्णय घेतील असे म्हंटले होते. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.

  • By Vishvas News
  • Updated: December 2, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक बातमी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. पोस्ट मध्ये असे वक्तव्य करण्यात येत होते कि गुजरात निवडणूक झाल्यावर लगेच समान नागरी कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात येईल असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस ह्यांनी केले आहे. विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि, देवेंद्र फडणवीस ह्यांनी ‘योग्य वेळी’ युनिफॉर्म सिव्हिल कॉड लागू केले आहे असे वक्तव्य केले आहे. ना कि गुजरात निवडणूक झाल्यावर युनिफॉर्म सिव्हिल कॉड लागू केले जाईल असे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Rohit Nilawar ह्यांनी एक कोटी भाजपा समर्थक ह्या फेसबुक ग्रुप वर पोस्ट शेअर करत लिहले: गुजरात राज्याचे इलेक्शन संपताच महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू होणार Devendra Fadnavis”

हि पोस्ट आणि ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात, गूगल सर्च द्वारे केली. आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी नुकतेच असे कुठले वक्तव्य केले आहे का, ह्याचा तपास केला. साधे किवर्ड सर्च करून आम्ही हा तपास केला.

आम्हाला एबीपी लाईव्ह वर एक बातमी सापडली. बातमीचे शीर्षक होते: Devendra Fadnavis on Uniform Civil Code : राज्यात समान नागरी कायदा लागू व्हावा यासाठी योग्य वेळी विचार करू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ह्या बातमीत म्हंटले होते: राज्यात समान नागरी कायदा लागू व्हावा यासाठी योग्य वेळी विचार करू, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात समान नागरी कायद्याबाबत मी अधिकृत घोषणा करू शकत नाही. कारण याबाबत घोषणा करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना असल्याचे फडणवीस म्हणाले.

हि बातमी इथे वाचा.

हीच बातमी आम्हाला साम टीव्ही च्या वेबसाईट वर देखील सापडली.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही भाजप चे राज्याचे प्रवक्ते, शिवराय कुलकर्णी ह्यांना संपर्क केला. विश्वास न्यूज सोबत बोलताना ते म्हणाले कि देवेंद्र फडणवीस ह्यांनी ‘योग्य वेळी’ सामान कायदा लागू करू असे म्हंटले आहे. त्यांनी गुजरात निवडणूक झाल्यावर युनिफॉर्म सिव्हिल कॉड लागू करू असे म्हंटले नाही. जे काम पूर्व सरकार करू शकली नाही, ते काम हि सरकार नक्की करू शकेल असे देखील त्यांनी म्हंटले.

शेवटच्या टप्यात विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर चा तपास केला. त्यात कळले Rohit Nilawar हे ‘भाजपा यवतमाळ जिल्हा युवा मोर्चा सोशल मीडिया संयोजक, युवा मोर्चा सह संयोजक, जिल्हा मीडिया प्रभारी’ आहेत.

निष्कर्ष: गुजरात निवडणूक झाल्यावर राज्यात समान नागरी कायदा लागू होईल असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस ह्यांनी केले नाही. त्यांनी योग्य वेळ आल्यावर हा कायदा लागू करू तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा निर्णय घेतील असे म्हंटले होते. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.

  • Claim Review : गुजरात निवडणूक झाल्यावर लगेच समान नागरी कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात येईल
  • Claimed By : Rohit Nilawar
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext page

Post saved! You can read it later