Fact Check: शाहरुख खान यांनी नितीश कुमार यांना नाही सांगितली माफी मागायला,डिपफेक व्हिडीओ व्हायरल
बिहारमध्ये एका कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तिथे हजर असलेल्या एका मुस्लिम महिलेचा हिजाब काढला होता.
- By: Umam Noor
- Published: Dec 31, 2025 at 10:07 PM
नवी दिल्ली(विश्वास न्यूज), बिहारमध्ये एका कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तिथे हजर असलेल्या एका मुस्लिम महिलेचा हिजाब काढला होता.त्यांनतर त्यामुद्द्यावरून सलमान खान,संजय दत्त,जावेद अख्तर यांच्या नावाने ही बनावट पोस्ट व्हायरल झाल्या.या दरम्यान आता शाहरुख खान यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.या व्हिडीओ मध्ये शाहरुख खान नितीश कुमार यांना माफी मागण्यास सांगत असल्याचे दिसते.अनेक सोशल मीडिया युजर्स हा व्हिडीओ खरा समजून शेअर करत आहेत.
आमच्या पडताळणीत आढळले की शाहरुख खान यांच्या व्हिडीओमध्ये एआयच्या मदतीने ऑडिओ जोडण्यात आला आहे.हिजाब प्रकरणात शाहरुख खान यांनी कोणतेही विधान केलेले नाही.मूळ व्हिडीओ 2020 मधील आहे,जेंव्हा त्यांनी कोरोना विषाणू विषयी जनजागृतीचा संदेश दिला होता.
काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?
फेसबुक युजर ‛मोहम्मद तारिक अनवर’नी 20 डिसेंबर रोजी पोस्ट शेअर करत लिहले,“SRK” Shahrukh ” Khan “नितीश कुमार” हिजाब प्रकरणावर काय बोलले आहेत “ शाहरुख खान” ची काय आहे व्हायरल पोस्ट?
फेसबुक युजर ‛मोहम्मद तारिक अनवर’नी 20 डिसेंबर रोजी पोस्ट शेअर करत लिहले,“SRK” Shahrukh ” Khan ने “नितीश कुमार” हिजाब प्रकरणावर काय बोलले आहे “ शाहरुख खान” ची पोस्ट अर्काइव व्हर्जन इथे पहा

पडताळणी
या प्रकरणावर आम्ही आमची पडताळणी सुरू केली आणि आम्ही व्हिडीओच्या की-फ्रेमला गुगल लेन्स व्दारे सर्च केले तर आम्हाला हा व्हिडीओ शाहरुख खानच्या एक्स हँडलवर अपलोड केलेला दिसला.इथे व्हिडिओ 20 मार्च 2020 रोजी अपलोड केला आहे.इथे शाहरुख खान कोरोना व्हायरस बाबतीत बोलताना दिसून येतात.
याच आधारे पडताळणी पुढे नेली आणि आम्हाला खऱ्या व्हिडीओबद्दल माहिती मिळाली त्यात एनडीटीव्हीच्या वेबसाईटवर ही बातमी मिळाली. 20 मार्च 2020 च्या बातमी प्रमाणे “शाहरुख खानने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरती अनेक व्हिडीओ शेअर केले ज्यात ते कोरोना व्हायरस महामारीबद्दल बोलले. ऍक्टरनी त्यात त्यांच्या फॅन्सना कोरोना संबंधी सावधगिरी बाळगण्याबाबत आवाहन केले आणि घाबरून जाऊ नका म्हणून सांगितले.
पडताळणी दरम्यान आम्ही व्हिडीओमधील ऑडिओचा भाग वेगळा केला आणि त्याची तपासणी एआय-निर्मित व्हिडीओ आणि ऑडिओ ओळखणाऱ्या हाइव मोडरेशन टूलवर केली.यात आम्ही व्हायरल व्हिडिओला प्रत्यक्ष टूलवर अपलोड केले तेंव्हा हा व्हिडीओ 79.4 ℅ एआय निर्मित असल्याचे निदर्शनास आले.

व्हायरल व्हिडीओमध्ये एआयव्दारे छेडछाड केल्याची शक्यता असल्याने आम्ही ऑडिओची audition.ai वर तपासणी केली.टूल ऑडिओ पिच पॅटर्न,व्हॉइस मिड्यूलेशन, नेचुरल पोज आणि सिंथेटिक साऊंड वेव्हसमुळे ऑडिओ 100% एआय जनरेटेड असल्याची शक्यता आहे.व्हायरल व्हिडीओ प्रमाणित करण्यासाठी आम्ही एआय एक्स्पर्ट अजहर माचवे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ही माहिती देताना सांगितले की व्हिडीओ मध्ये एआयचा वापर करून ऑडिओ जोडला आहे आणि डीपफेक आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ टूलच्या मदतीने अगदी सहजरित्या बनवता येतात. तसेच ते म्हणाले की शाहरुख खानची लिपसिंग आणि ऑडिओ वेगळे करून लक्षपूर्वक ऐकले तर फरक लगेच लक्षात येतो.

इंडिया एक्स्प्रेसच्या रिपोर्ट प्रमाणे, 15 डिसेंबर 2025 रोजी पटनामध्ये आयोजित एक सरकारी नियुक्ती पत्र कार्यक्रम सुरू होता. या दरम्यान एक मुस्लिम महिला डॉक्टरचा हिजाब बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व्दारे हटवण्याची घटना समोर आली.ही घटना कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाली.त्यानंतर राजनैतिक पक्ष,सामाजिक संस्था आणि सामान्य जनतेकडून तिखट प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या आहेत.बऱ्याच लोकांनी ही घटना महिलेच्या वैयक्तिक आणि धार्मिक स्वतंत्रतेबद्दल असंवेदनशील असल्याचे म्हणले आहे. या घटनेबद्दल पूर्ण माहिती इथे वाचता येऊ शकते.
पडताळणी पुढे नेत आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की या घटनेबद्दल शाहरुख खानने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे का.न्यूज सर्च केल्यानंतर याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही.
आता वेळ होती बनवट बातमी शेअर करणाऱ्या फेसबुक युजरचे सोशल स्कॅनिंग करण्याची.आम्हाला आढळले की मोहम्मद तारिक अनवरला पाच हजार लोकं फॉलो करतात.तिथे युजर फेसबुकवर खूपच सक्रिय असतात.
निष्कर्ष: आमच्या पडताळणीत आम्हाला असे आढळले की शाहरुख खानच्या व्हिडीओमध्ये एआयचा वापर करून ऑडिओ जोडला आहे.हिजाब प्रकरणावर शाहरुख खानने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.तो व्हिडीओ 2020मध्ये कोरोना व्हायरसच्या अवेयरनेससाठी बनवला गेला होता.
- Claim Review : शाहरुख खानने नितीश कुमार यांना माफी मागायला सांगितली.
- Claimed By : फेसबुक युजर ‛मोहम्मद तारिक अनवर’
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.











